नवीन लेखन...

मी उशाला तुझी आठवण ठेवतो

रोज स्वप्नामधे तोच क्षण ठेवतो
मी उशाला तुझी आठवण ठेवतो

रोज म्हणतो तिला “हे प्रिये ! मी तुझा ”
आणि त्याच्यापुढे एक “पण….” ठेवतो

प्रेम म्हणजे जणू एक असतो हिरा
एकजण फेकतो एकजण ठेवतो

पाहिजे तर उभा जन्म देतो तुला
फक्त माझ्याकडे बालपण ठेवतो

सर्व नेतो लुटुन एक ‘तो’ शेवटी
फक्त देहामधे ताठपण ठेवतो

— महेश मोरे (स्वच्छंदी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..