कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते ।
शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥
आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद,
कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची देखील क्षमता तशीच असल्याने तिच्या हातातील धनुष्याला ही कोदंड म्हटले आहे.
हे कोदंड आणि बाण धारण करणाऱ्या,
कोकाकार- कोका अर्थात पांढऱ्या कमळाच्या उमलण्यास सिद्ध असणाऱ्या टपोऱ्या कळीप्रमाणे आकार असणाऱ्या,
कुचद्वयो- स्तन युगुलावर,
परिलसत्प्रालम्बहाराञ्चिते- रुळणाऱ्या मोत्यांच्या माळांनी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या,
शिञ्जन्नूपुर- मनोहरी किंकिंण करणाऱ्या पैजणरूपी,
पादसारस- सारस पक्षी जसा कमळावर बसून आवाज करतो तशी ती पैंजणे चरण कमला वर ध्वनी करीत आहेत अशी,
मणीश्रीपादुकालंकृते- रत्नजडित सौंदर्याने संपन्न खडावा चरणात धारण करणाऱ्या, रत्न आणि सोने यांचे पैंजण देखील राणी शिवाय कोणाला वापरण्याची परवानगी नाही. संपूर्ण विश्वाची महाराणी असणारी आई जगदंबा पैंजणच नव्हे तर खडावा देखील रत्नजडित वापरते
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्यश्री एका वेगळ्याच भूमिकेला आपल्यासमोर ठेवतात. येथे त्यांनी वापरलेली उपमा अत्यंत मनोज्ञ आहे. आचार्य श्री म्हणतात,
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे – माझ्या दारिद्र्य रुपी सर्पा करिता गरुड रुपी पक्षी असणाऱ्या, अर्थात जसे गरुडाला पाहताच सर्प पळून जातो तसेच तिच्या दर्शनाने संपूर्ण दारिद्र्य लुप्त होते अशा सकल दारिद्र्य विनाशिनी,
मां पाहि मीनाम्बिक- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply