नाच नाचती तालावरती
मीरेची पाऊले
चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ
लागला प्रभुचा ध्यास
हरि दिसे नयनास
चलबिचल नजर होऊन
अंग सारे मोहरले – – -१
चित्त ते हरीमय जाहाले
न राही आपले भान
झाली भजनी तल्लीन
तनमन प्रभुचे ठायी जाता
संसार ते विसरले. – – – २
चित्त ते हरीमय जाहाले
विषाचा घेता प्याला
हरि तो त्यातची दिसला
झेपावूनी गेली त्याच क्षणी
घट घटा प्राशन केले. – – – ३
चित्त ते हरीमय जाहाले
जहाल होते विष
मृत्युचा तो पाश
प्रभूभक्तीच्या शक्तीने परि
अमृत ते बनले – – – ४
चित्त ते हरीमय जाहाले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply