शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा अशा कार्टून मागे असलेला आवाज मेघना एरंडे. तिचा जन्म २४ एप्रिल १९८१ रोजी झाला.
मेघना एरंडेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन अनेक कार्टून्सना मेघना एरंडे ने आवाज दिला आहे, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट ठरला. निंजा हतोरी हे कार्टून खूप हुशार, मजेशीर, प्रामाणिक आहे.
निंजा सगळी लहान मुलं बघतात याचं भान ठेवावं लागतं. शिनचॅनचं ‘इतनी भी तारीफ मत करो’ हे लोकप्रिय वाक्य किंवा निंजाचा ‘डिंग डिंग डिंग’हा आवाज कानावर पडला, की सगळ्या बच्चे कंपनीच्या टीव्हीवर उड्या पडतात. ही कार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज मेघना एरंडेचा. कार्टून्सची समयसूचकता, त्याचा खरेपणा, त्याची समतोल साधण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचा मेघनाला अभ्यास करावा लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply