नवीन लेखन...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले

मेघराजराजे भोसले यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.

मेघराज राजे भोसले यांचा जन्म बारामतीजवळच्या सणसरचा. भवानीनगर येथे त्यांचं प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय शिक्षण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. लहानपणापासूनच चित्रपट, नाट्य क्षेत्राची आवड असल्यामुळे ते कला क्षेत्राकडे वळले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. गेल्या दोन दशकांपासून ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याच संस्थेतर्फे त्यांनी पंधरा मराठी नाटके तसेच वाद्यवृंद कार्यक्रमांचीही निर्मिती केली. खास महिलांसाठी लावणीप्रधान कार्यक्रमाची निर्मिती केली. त्याचे एक हजाराहून अधिक प्रयोग झाले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाबरोबरच ते बालगंधर्व परिवार, पुणे, ऑल आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन, पुणे, मराठी लोककला, लावणी निर्माता आणि कलाकार संघ, नाट्य निर्माता संघ, पुणे, कलासंस्कृती परिवार, पुणे, सांगाती फाऊंडेशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आदी संस्थांचेही ते अध्यक्ष आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने चित्रपटसृष्टीच्या हितासाठीचे अनेक उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबविले आहेत. नुकतीच मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या चित्रपट संस्थांची शिखर संस्था म्हणून फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ओळखली जाते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..