नवीन लेखन...

गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि प्रकार

शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने, सहाजिकच महाराष्ट्र सहकार कायद्यात गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या. कधी कधी तर काही सुधारणामध्ये सदस्यांना समजण्यापूर्वी बदल होतात. जसे सहयोगी सभासद. जेणेकरून सभासत्वाबाबत स्पष्टता नसल्याकारणाने सदस्यात कमालीची संभ्रमावस्ता होती व आहे. आजच्या लेखात काय आहे नेमका सदस्यत्वातील प्रकारातील फरक तो आपल्या माहितीसाठी देण्यात आला आहे. आपण रहातो त्या संस्थेचे वर्गीकरण हे “भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था” असते. या प्रकारात संस्थेची इमारत ज्या जमिनीवर उभी आहे, ती जमिन व इमारत कायद्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण संस्थेच्या मालकीची असते, परंतु त्या इमारतीतील सदनिकेमधील निवासाचा हक्क हा स्थावर मालमत्तेचा भाग असल्याने मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८७२ मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार दुसऱ्यास हस्तांतरीत करता येतो. सर्व प्रथम सदस्य म्हणजे कोण हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. सदस्य म्हणजे अशी व्यक्ती जी एखादया गृहनिर्माण संस्थेची नोदणी करण्याआधी, सदर अर्जात नाव अंतर्भूत असणारी व्यक्ती. किंवा नोंदणी झाली असेल तर सदर संस्थेत यथोचीतरीत्या नाव दाखल करून घेतलेली व्यक्ती.

सदर व्यक्ती ही सहयोगी, सह किंवा तात्पुरता सदस्य असू शकते.

सहयोगी सदस्य :

एखाद्या सदस्याच्या लेखी शिफारशीवरून त्याच्या लेखी पूर्व संमतीने त्याच्या हक्क व कर्तव्याचा वापर करण्यासाठी, जिला गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यकुलात यथोचीतरीत्या दाखल करून घेतलेले असेल आणि भाग पत्रामध्ये ज्याचे नाव प्रथम स्थानी नसेल अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे पती, पत्नी, माता, पिता भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, जावई, सून, पुतण्या, पुतणी असा आहे.सदनिका मालमत्ता सयुक्तपणे धारण न केलेला अथवा सदनिका मालमत्ता संयुक्तपणे नावे नसलेला, पण फक्त रुपये १००/- भरणा करून मूळ अस्तित्वातील सभासदासोबत सहयोगी सभासद घेणारा असा सभासद. अशा सभासदास संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य होण्यासाठी मूळ अस्तित्वातील सभासदाकडून ना हरकत घ्यावे लागते.

सह सदस्य :

सदनिका मालमत्ता खरेदी व्यवहारात एका अथवा दोन व्यक्तींनी समान वाटा उचलून सदनिका खरेदी करून, मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८ नुसार शासन मुद्रांक अदा करून नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये संबंधित निबंधकाकडे मालमत्ता नोंदणीकृत केली असेल तर त्यातील नोदणी करारपत्राप्रमाणे प्रथम क्रमांकावरील नाव संस्थेच्या समभागपत्रावर असेल त्यास “प्राथमिक सदस्य” आणि दुसरे क्रमांकाच्या नावास “सह सदस्य” असे म्हणतात.

तात्पुरता सदस्य :

एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर संस्थेचा सदस्य म्हणून कायदेशीर वारसाला किंवा वारसांना दाखल करून घेण्यात येईपर्यंत नामनिर्देशनाच्या आधारे, त्या सदस्याच्या जागी तात्पुरत्या रीतीने संस्थेचा सदस्य म्हणून ज्या संस्थेत यथोचीतरीत्या दाखल करून घेतलेले आहे, अशी कोणतीही व्यक्ती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम २२ मध्ये काहींही अंतर्भूत असले तरी, संस्थेस, कोणत्याही व्यक्तीला सहयोगी, सह किंवा तात्पुरता सदस्य म्हणून दाखल करून घेता येईल.

मतदानाचा अधिकार

सहयोगी सदस्यास एखाद्या सदस्याच्या लेखी पूर्व संमतीने मतदान करण्याचा हक्क असेल.

सह सदस्याच्या बाबतीत जेचे नाव भागप्रमाणपत्रामध्ये प्रथम स्थानी असेल. तिच्या अनुपस्थितीत, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तिंस मतदानाचा हक्क असेल आणि दोघांच्या अनुपस्थितीत जिचे नाव त्या पुढील स्थानावर असेल व जी अज्ञान नसेल त्या व्यक्तीला मतदानाचा हक्क असेल. तात्पुरत्या सदस्यास मतदानाचा हक्क असेल.

— अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..