नवीन लेखन...

‘ना शिव्या, ना ओव्या!’

Memories of GaDiMa

गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए.क.कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा ‘ए.क.कवडा’ नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की  ‘ए.क.कवडा’ म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.

 

पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात

“पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर”

गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल

“चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते

माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!”

कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात

“तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले

घेऊ धजती इज्जत कैसी ‘लिज्जत पापडवाले'”

दुर्गाबाई भागवतांबद्दल…

“जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां

दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता”

गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर

“बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली

गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?”

राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते ‘रा.नि.बढे’ आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले ‘राजा बढे’,पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले…

“कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?

आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?”

रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत

“गिरीशांची ही गर्द ‘आमराई’

त्यात उघडी यशवंत पाणपोई”

स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

“कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा

काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?”

 

— सुमित्र माडगूळकर 

Avatar
About सुमित्र माडगूळकर 8 Articles
महाकवी ग.दि.माडगूळकर यांचे नातू. गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते. गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती. जोगिया या सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने काढलेल्या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.

1 Comment on ‘ना शिव्या, ना ओव्या!’

  1. नमस्कार.
    – ग.दि.मां वर प्रेम करणार्‍यांना हा लेख नक्कीच आवडेल.
    – ग.दि.मा. के.ई. एम्. मध्ये होते, त्या आठवणींचा त्यांनी लिहिलेला लेख अजून माझ्या स्मरणात आहे.
    -गीत रामायाणावर तर माझेंही अन्य हजारोंप्रमाणें, प्रेम आहे. त्याच्या मी केलेल्या हिंदी भाषांतरबद्दल मी पंचवटीमध्ये ( ते गेल्यानंतर कांहीं काळानें ) येऊन गेलेलो आहे, व मला विद्याताईंचें स्वीकृति-पत्रही मिळालें होतें. नंतर मी त्यासंदर्भात श्री. सुधीर फडके यांना ही भेटलो होतो. इतक्या वर्षांनंतर त्या सर्व स्मृती अजूनही ताज्या आहेत. आपल्या लेखामुळे त्यांना उजाळा मिळाला. धन्यवाद.
    – त्यांची व त्यांच्या बद्दलची पुस्तकेंही मी वाचलेली आहेत.
    – आपल्याशीही मी कांहीं वर्षांपूर्वी ( कांहीं अन्य कारणानें) बोललेलो आहे.
    – कृपया आपला ईमेल आय्.डी. कळवावा. ( एस्. एम्. एस्. किंवा ईमेल नें ) . आपल्याशी संपर्क साधतां येईल.
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक
    सांताक्रुझ , मुंबई
    (मो. – 9869002126)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..