नवीन लेखन...

आठवणी गावाकडच्या..।

…. ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण मंडळी आमच्या ग्रामीण भागातील दिवाळी ही अतिशय आनंद देणारी मनाला चालना देणारी अशी आहे. आमच्या घरा पुढे नांदू न आलेल्या मुली नागपंचमी गौरी-गणपती या सणाला या मुलींनी गायलेली गाणी अजून माझ्या लक्षा तून जात नाही त. वर्षातील बारा सण वेगवेगळ्या विषयाची माहिती सांगून जातात ही तर खरी ग्रामीण भागातील साहित्याची ओळख आहे हे नाकारता येत नाही..।

… दिवाळीला किल्ला करायचा ही आवड मला पहिल्यापासून आहे. पण 1967 ला मी आमच्या घरासमोर एक किल्ला तयार केला होता. चारपाटय शेतातील माती आणून. भिताडाशे जा री मातीचा एक डोंगर तयार केला होता मातीच्या तिन्ही बाजूला कुंभारी नळी आकाराची भाजलेली कवले मातीत खुपसून ठेवली होती. त्या डोंगराच्या मातीच्या ढिगार्‍या वरती दुकानातील हळीव टाकून त्यावर थोडी माती टाकून. मी मी दिवाळीच्या अगोदर या किल्ल्यावर पाणी मारत होतो. ती हळीव पाण्याने फुगुन त्याचे रोप तयार झाले होते आणि दिवाळीच्या वेळी ही बारीक झाडे हिरवीगार मला सुंदर दिसत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी घेतलेली किल्ले . ही आठवण प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. मी लहानपणी किल्ले सुद्धा बनवले बरेच डेकोरेशन केले पण आमच्या गावातील बऱ्याच लोकांनी माझ्या कले ची किंमत केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजां चा इतिहास घडवणारा शिवाजी सारखा थोर पुरुष पुन्हा जन्माला येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांनी मोगलांच्या कडून घेतलेली किल्ले याची आठवण दिवाळीच्या सणा दिवशी लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे युगपुरुष पुन्हा जन्माला येथील की नाही याची मला शंका वाटते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी अमर आहेत परवाच माझ्या मुलाने म्हणजे स्वप्निल मानुगडे या मुलांन प्रतापगड हा किल्ला बनवला होता. हा प्रतापगड किल्ला पाहून माझ्या डोळ्याच पारने फिटले माझ्या किल्ल्याला गावातील माणसांनी दाद दिली नाही पण माझा मुलगा गेली काही वर्षे किल्ला बनवत आहे याचा आनंद मला मनस्वी होत आहे. माझ्या मुलाची कला पाहून मी फार आनंदी झालो आणि माझ्या ओठातून शब्द येऊ लागले. जय शिवाजी जय भवानी माझी अर्धवट राहिलेली किल्ल्याची कला माझ्या मुलांनी पुढे चालू ठेवली याचा आनंद मला फार झाला..।

… अगदी छोट्या वयात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी 13 किल्ले हातात घेतले हा इतिहास कितीतरी मोठा आहे. पण हल्ली व्याख्यान करणाऱ्या प्राध्यापकांनी शिवाजी महाराज यांचा बाजार मांडला आहे. हे नीतीला धरून नाही शिवाजी म्हणजे आमचा शिवाजी होय असा शिवाजी महाराज पुन्हा येणार नाही जय शिवाजी व शिवाजी महाराजांनी मोगलांच्या हातून घेतलेल किल्ले त्याचे संगोपन रिपेरी करणे गरजेचे आहे. सध्यातरी बाळ ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काही किल्ल्यांची पडझड झाली आहे ती दुरुस्त करून घ्यावी. खरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीसाठी उपयुक्त असा ठरेल असे मला वाटते धन्यवाद..।

-–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..