जळत होती मेणबत्ती ती, मंद मंद प्रकाश देवूनी
अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी…१,
बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं
असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२,
वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे
मेणबत्तीची ज्योत आम्हांला, शिकवी साधे तत्त्व जीवनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Very nice