‘देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां ‘अभिमान’
गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान |
स्वातंत्र्याचे ‘सेनानी’ अन क्रांतिवीरांना सलाम
संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम |
प्राण देऊनी त्यांनीदिधले, ‘स्वातंत्र्याचे’ दान,
त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान |
पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा,
काय जाहली बघ तुझी ही, आज अशी ‘दूर्दशा’ |
कैसे जडले तुजला देशा , तीन भयंकर रोग?
पॉप्युलेशन, पोल्यूशन वर करपशनाचे भोग |
देशा तुझीया सुरक्षेची कुणी न घेती हमी,
तीनही मार्गे शत्रू घुसूनी करीती ते हानी |
आदर्शाला कुणी ना पात्र, घोटाळे मात्र,
स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार अन् खूनही सर्वत्र |
न्यायदेवता तुझी खरोखर, आज होई आंधळी,
अपराध्याला कधी न होई शिक्षा त्याचवेळी |
‘नैतिकमूल्ये’ ढासळताना नाही पाहवत देशा,
पुनश्र्च निघु दे धूर ‘सोन्याचा’, हेची सांगणे ईशा |
— सौ.अलका वढावकर
Leave a Reply