नवीन लेखन...

पाण्याऐवजी पारा?

एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.

आता इथेही तो पडताळा पाहू म्हणून विचारे सरसावले. उकळत्या पाण्यात त्यांनी थर्मामीटर धरला, तापमान वाचले आणि त्यांना धक्काच बसला. पारा ९० आणि १०० अंश सेल्सिअसच्या मध्येच कुठेतरी थांबला होता.. उकळत्या पाण्याचे तापमान १०० पेक्षा इतके कमी कसे? थर्मामीटर तर नेहमीचाच आहे, म्हणजे तो चुकीचे तापमान नक्कीच दाखवणार नाही. मग असे का झाले?

विचारेकाकांचे शंकानिरसन करण्यासाठी त्यांचा एक मित्र पुढे झाला. “उंच ठिकाणी हवेचा दाब कमी असतो, त्यामुळे पाणी नेहमीपेक्षा कमी तापमानाला उकळते. आणखी उंच ठिकाणी गेलो तर पाणी आणखी कमी तापमानाला उकळेल, तू पाहिजे तर प्रयोग करून बघ.” मित्राने विचारेंना सुचवले. लवकरच हिमालयातल्या कुठल्या तरी उंच पर्वतशिखरावर जाऊन हा प्रयोग करायचे विचारेंनी ठरवून टाकले. अशा उंच ठिकाणी स्वतःची गाडी घेऊ न जाता आली तर आणखी एक प्रयोग करून बघायचीही त्यांची इच्छा होती. त्याचे काय झाले? डोंगरमाथ्यावर घाट चढून येताना, विचारेंची गाडी गरम होऊ न धापा टाकू लागे. या वेळीही या थंड हवेच्या उंच ठिकाणी येताना गाडीच्या रेडिएटरमध्ये असलेले पाणी उकळायला लागल्यामुळे गाडीला काही काळ विश्रांती द्यावी लागली होती.

तेव्हाच विचारेंनी विचार केला होता. पाणी १०० अंश सेल्सिअसला उकळत असल्यामुळे अनेक वेळा आपली गाडी गरम होऊ न बंद पडते. आपण रेडिएटरमध्ये जर पाण्याऐवजी एखादा जास्त उत्कलनबिंदू असलेला द्रवपदार्थ वापरला तर काय होईल? आता पुढच्या वेळी आपण दोन प्रयोग नक्की करून पाहायचे असे विचारेंनी ठरवले. एकतर उंच डोंगरमाथ्यावर पाण्याचा उत्कलनबिंदू ३०० अंश सेल्सिअसहूनही जास्त असल्यामुळे तो लवकर उकळून गाडी बंद पडण्याचा प्रश्नच येणार नाही. तुम्हाला काय वाटते, रेडिएटरमध्ये पाण्याऐवजी पारा घातला तर योग्य होईल का? जरा विचार करा.

-डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..