अगदी हिमालय, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेथी सर्वत्र आढळते. तसेच ते श्रीलंकेपासून ते मध्य आशिया खंड, युरोप आणि अनेक आफ्रिकन खंडात हे प्रचलित आहे. आयुर्वेदात जरी हे मान्य केले तरी आज अनेक देशात मेथीचे बाबतीत संशोधन चालूच आहे. तरीही आयुर्वेदात मेथीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मेथीमुळे मधुमेह व रक्तदाब यांना अटकाव होतो, असा शोध आयुर्वेदात लावला होता. तसेच मेथी हे नुसते भाजी नसून ते अत्यंत महत्त्वाचे औषधही आहे. ग्रीक अथवा लॅटीन यात मेथी औषधाचा उपयोग होतो. मेथीची भाजी खाल्ल्यास जेवणात भूक खूप लागते. त्याचप्रमाणे बाळंत झालेल्या बालकाकरिता पाजलेल्या दुधाचा चांगला उपयोग होतो, असे आयुर्वेदात सांगतात. एवढेच नव्हे तर मेथी अरब देशांतही गर्भवती अथवा बाळंत स्त्रीयांना मेथीचा उपयोग होतो. मेथीची पाने उन्हात वाळवून त्याची पावडर करून त्यात अनेक भाजीत घालतात. हे फक्त भारतातच नव्हे तर अनेक युरोपात अथवा अमेरिकेमध्ये ही वापरला जातो. मेथी यात अल्कलीनचा गुणधर्म येतो तसेच यात लोह व चुना, गंधक तसेच जीवनसत्त्व ए भरपूर प्रमाणात येतात. तसेच प्रथिनेचे प्रमाणही भरपूर असते व त्यात एक प्रकारचा सुगंधही येतो. मेथीच्या पानाप्रमाणे मेथीचे दाणे (बी) अत्यंत औषधी असतात. रात्री थोडे मेथीचे दाणे कोमट पाण्यात भिजत घातल्यास रक्ताभिरण चांगले होते हे बी चावून खाल्ल्यास पंडुरोगाचा (अॅनेमिया) रक्तशुद्ध होते तसेच मधुमेहावरदेखील अत्यंत गुणी औषध आहे. तसेच वरील केलेली मेथी पावडर चपाती अथवा इतर पावडरबरोबर एकत्र केल्यास निश्चित फायदा होतो. मेथी दाणे साधारण ३० ते १०० ग्रॅम भिजत घालून त्यावर मोड येतात. हे मोड अत्यंत औषधी असते. अशा प्रकारची मोडाची आमटी केल्यास छातीत कफ झाल्यास निश्चित कमी होते. दम्याचा विकारही थांबतो. मात्र हे काही काळ नियमितपणे घेतले पाहिजे. तसेच घशाची खवखव ही थांबते. (मेथीची पूड केल्यास) मध्यंतरी एक महान संशोधक डॉ. कवीराज तसेच डॉ. खजानचंद हे बोर्ड ऑफ आयुर्वेदिक तसेच युनानी सिस्टीम यांनी १९६२ ते १९८५ सालापर्यंत अथक काम केले. त्याचबरोबर डॉ. आर. डी. शर्मा यांनेही मधुमेहावर खूप काम केले. तसेच कोलेस्ट्रेरॉल यांच्यावरही खूप काम केले होते. मात्र हे काम करताना या दोघांनी संशोधनात खूपच आश्चर्य वाटले. त्यांनी जर रोज १०० ग्रॅम मेथी पावडर रोज जेवताना कशातही घातली तर नक्कीच उपाय सापडतो. तसेच रक्तात कोलेस्ट्रेरॉल असल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. तसेच ट्रायग्लीसराईड्स कमी होतो. या सर्व संशोधकांनी एक गोष्ट निश्चित करते ते म्हणजे मधुमेह निश्चित बरा होऊ शकतो. त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन यांच्या मते जर मेथी पावडर ५० ते १०० ग्रॅम दररोज घेतल्यास आराम मिळतो. तसेच मेथी पावडरमध्ये जर नियमित घेतल्यास त्याचा प्रथिनाचाही चांगला फायदा होतो.
कारण त्यात तंतूमय पदार्थ (फायबर) भरपूर असतात. शेवटी जर मेथी पावडर अथवा मेथी भाजी नियमित घेतल्यास अल्प प्रमाणात असलेला मधुमेह खचितच बरा होतो. तसेच एक गोष्ट मात्र निश्चित की मेथी पाला अथवा पावडर हे अत्यंत सुरक्षित असते. हानिकारक कधीच नसते.
मात्र नवीन संशोधकाप्रमाणे आज बरीच माहिती उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक शास्त्रज्ञाने आपली माहिती तेवढीच जपणवूक ठेवली आहे. आज मेथीमध्ये अनेक खनिज द्रव्ये, जीवनसत्त्व तसेच तंतू शरीरात खूपच आढळतात. त्याचप्रमाणे आज मेथीवर कोलेस्ट्रेरॉलवर काय परिणाम होतो, वरही बरेच संशोधन झाले आहे. त्याप्रमाणे आज मेथीमुळे कोलेस्ट्रेरॉल खूप प्रमाणात कमी होत जाते. तसेच पेक्टीन हे द्रव्यही मेथीमध्ये तयार होते. अगदी त्याचप्रमाणे प्रथिनेहीदेखील फार गुणकारी असते. त्यात अमायनो ॲसिडचा खूप भाग असतो. अगदी त्याचप्रमाणे मेथीमध्ये तांबे, लोह, जस्त तसेच पोटॅशियम व कॅल्शियम यांचा प्रभावदेखील बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. आणि जीवनसत्त्व बी १, बी २, नियासीन जीवनसत्त्व ए व सी हेदेखील भरपूर प्रमाणात सापडते.
मेथीची भाजी करताना त्यात मेथी दाण्याची पावडर केल्यास अत्यंत औषधी मानली जाते. मेथीचे लाडू प्रामुख्याने गर्भवती आणि बाळंतीणीला देतात. बाळंतीण, पंडूरोग तसेच मधुमेह यावर गुणकारी ठरते. मेथीचे मोड आल्यास त्याची आमटी अथवा सांबार करण्याची प्रथा असते.
१०० ग्रॅम मेथी घेतल्यास त्यात खालील गुणधर्म आढळतात.
-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–-–
– मदन देशपांडे
Leave a Reply