नवीन लेखन...

मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा

मुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू  जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती.

इतिहास

मेट्रो सिनेमा ५ जून १९३८ रोजी सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. या सिनेमागृहाचं बांधकाम मेट्रो गोल्डविन मेयर (MGM) यांनी केलेलं असून या सिनेमागृहाला तेच चालवायचे. या सिनेमागृहाला बांधण्यामागे सर्वप्रथम उद्देश हा होता की, MGM चे चित्रपट चित्रपटगृहात दाखवणे. त्याकाळी चित्रपटगृहाचा अंतर्भाग, जमिन, भिंती, छत व फर्निचर हे सगळं लालसर गुलाबी रंगछ्टेचं होतं. येणार्‍या प्रेक्षकांना संगमरवरी प्रवेशकक्षात व जिन्यांवर अशर्स उत्तम सेवा देत असत. सिनेमागृहात अनेक भित्तीचित्र होती जी, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी चार्ल्स गेराडच्या देखरेखीखाली बनवलेली. १९५५ साली हे सिनेमागृह पहिल्या फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड्सचे ठिकाण होते. १९७० साली गुप्ता घराण्याने हे सिनेमागृह ताब्यात घेतले. पुढे हे लवकरच बॉलीवूडचं एक प्रसिद्ध रेड कार्पेट सिनेमागृह बनलंं. या सिनेमागृहात भारतीय सिनेमातील प्रख्यात कलाकारांची उपस्थिती इतकी प्रख्यात झाली की, दर चित्रपट प्रदर्शनास दंंगा नियंत्रण करणार्‍या पोलीस दलास पाचारण करण्यात येऊ लागलं. सिनेमागृहाचे मुख्य वास्तूविशारद न्यूयॉर्क शहरातील थॉमस डब्ल्यु. लॅंब हे असून सहाय्यक वास्तूविशारद डी. डब्ल्यु. डिचबर्न हे होते. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यात ही वास्तू लक्ष्य केल्या गेलेल्या मुख्य वास्तूंपैकी एक वास्तू होती.

इतक्या अभूतपूर्व यशानंतरही मेट्रो सिनेमाला मल्टीप्लेक्स बनण्याच्या हल्ल्यापासून रोखणं कठीण झालं. १४९१ इतकी भव्य आसनक्षमता तुडुंब भरण्यासाठी जाहिरातदारांनी जुनं सिनेमागृह मल्टीप्लेक्समध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अ‍ॅडलॅब्स सिनेमाने मेट्रो सिनेमागृहाला ताब्यात घेतलं. २००५ सालाच्या सुरुवातीला सिनेमागृह बंद होऊन २००६ साली करण जोहरच्या “कभी अलविदा ना कहना” या चित्रपटाने सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यात आले. तेव्हापासून चित्रपटगृह “मेट्रो अ‍ॅडलॅब्स” या नावाने ओळखलं जाऊ लागलं. सध्या सिनेमागृहात ६ स्क्रीन्स आहेत. हे सिनेमागृह मुंबईमधील सर्वात मोठ्या मल्टीप्लेक्स स्क्रीन्सपैकी एक आहे.

आतापर्यंत चारवेळा चित्रपटगृहाचं नाव बदलण्यात आले आहे. १९३८ – २००६ ते मेट्रो सिनेमा म्हणून, २००६ – २००८ मेट्रो अ‍ॅडलॅब्स म्हणून, २००८ – २०१६ मेट्रो बिग सिनेमास् म्हणून तर सध्या मेट्रो आयनॉक्स म्हणून या सिनेमागृहाला ओळखण्यात येतं.

पत्ता : धोबीतलाव, महात्मा गांधी पथ, मरीन लाईन्स, मुंंबई 

संपर्क : ०७०४५९८६९०८

— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक) 

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..