एकदा अब्दुल कलामांना एरोडे येथे एका कार्यक्रमात बोलावलं होतं,तिथे त्यांना भेट म्हणुन प्रायोजकाने त्यांच्या कंपनीचा मिक्सर देउ केला, तो घेण्यास कलामांनी नकार दिला मात्र त्यांच्या कुटुंबाकरीता त्यांना मिक्सर हवा होता . त्यामुळे त्यांनी त्या मिक्सर च्या किंमतीएवढा ४८५० रुपयांचा धनादेश प्रायोजकांना देऊ केला अन तो मिक्सर विकत घेतला. पण त्या प्रायोजक कंपनीने एक महिना झाला तरी तो धनादेश बँकेत जमा न करता तसाच ठेवला.
एक महिना झाला तरी धनादेश वटला नाही हे पाहून कलामांच्या कार्यालयातून त्या कंपनीला फोनकरून धनादेश न वटल्या बद्दल चौकशी केली गेली. त्या प्रायोजक कंपनीने देखील धनादेश जमा करणार नसल्याचे सांगून टाकले. त्यावर धनादेश जमा करणार नसाल तर ते मिक्सर कंपनीच्या पत्त्यावर परत पाठवून देऊ अशी बतावणी कलामांनी कंपनीला केली, त्यावर त्या कंपनीने तो धनादेश बँकेत जमा करण्याची तयारी केली, तत्पूर्वी त्या धनादेशाचे एक प्रत छायांकित करून संग्रही ठेवली .
दुसऱ्याच दिवशी धनादेश बँकेत जमा होऊन तो वटवला गेल्याचे काळातच कलामांच्या कार्यालयातून पुनःश्च आभार मानणारा दूरध्वनी गेला, ही घटना ऑगस्ट २०१४ मधील असून त्या कंपनीचे नाव सौभाग्या ग्राइंडर्स असे आहे. सोबत त्या धनादेशाचे प्रत जोडत आहे .
काही पालक तर आपल्या मुलांचे संपूर्ण शिक्षण आफीसच्या स्टेशनरीवर करतात असे ऐकतो .नाहीतर बगा ना सध्या हजारो करोड चा घोटाळा करून एक कुटुंब सहानुभूती मिळवण्यासाठी धडपडत आहे.
आणि एका निवृत्त राष्ट्राध्यक्षानी तर सैनिकांची जमीन स्वतःच्या बंगल्यासाठी वापरली .कलामांचे वागणे आदर्श ठेवणारे होते . दुसरे एक राष्ट्रपती होते ते परदेश दौऱ्यावर जाताना आपल्या 20 / 25 नातेवाईकांना बरोबर घेऊन जात . तो त्यांचा आदर्श . नंतर त्यांनी बंगल्यासाठी लष्कराची जमीन घेऊन अजून एक आदर्श घालून दिला.आम्ही तर सरकारी बंगल्यातल्या नळाच्या तोट्यापण चोरुन नेतो.
अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्त्व.. मोठेपणाचं कुठलंच प्रदर्शन कधीच न करणारे, त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात कायम राहतील.
विनम्र अभिवादन!
— संतोष द पाटील
Leave a Reply