नवीन लेखन...

मी मराठी माझीही मराठीच

२७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे.
खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील.
सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले तू गोविदः, प्रभाते करदर्शनम् ll असं एकेकाळी म्हटलं जायचं.
त्यानंतर मराठी वर्तमानपत्रं वाचलं जायचं. रेडिओवरती सुमधुर भक्तीगीतं लागलेली असायची. वाड्यातील सार्वजनिक नळावरती पाण्याच्या नंबरावरुन होणारी भांडणं ‘अस्सल’ मराठीतच असायची.
सगळं आवरुन आम्ही मराठी शाळेतच जायचो. मराठीचे गुरूजी तनमन विसरून मराठी कविता शिकवायचे. त्या शिकविलेल्या कविता अजूनही तोंडपाठ आहेत.
दुपारच्या सुट्टीत घरचा डबा उघडला की, भाजी पोळीचा दरवळ सुटायचा. मित्रांना डब्यातला घास देऊन, त्यांच्या डब्यातील भाजीची चव चाखून लंगडी, कबड्डी सारखे मराठमोळे खेळ खेळायला मैदानावर पळायचो.
शाळेतील निबंध स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकविण्यासाठी प्रयत्न करायचो. वार्षिक स्नेहसंमेलनात भाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या विविध गुणांचे दर्शन करायचो. त्याबद्दल मिळालेली प्रशस्तिपत्रके अजूनही जपून ठेवली आहेत.
शाळा संपली, महाविद्यालयातही मराठी विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांबद्दल अधिक आपुलकी वाटायची. काच फलकात लागणाऱ्या मराठी वाड्मय मंडळाचे लेख व कविता मीच सजवलेल्या असायच्या. वर्षअखेरीस या सर्व साहित्याचा छापील स्वरूपातील अंक मी मोरपीसाप्रमाणे जपला आहे.
व्यवसायात पडल्यावर मराठी नाटक व चित्रपटांची कामे करताना दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ संपर्कात आले. संगीत नाट्यप्रयोग, कौटुंबिक व विनोदी नाटकं पाहून मराठीतील गडकरींपासून ‘पुलं’ पर्यंतच्या लेखकांची श्रेष्ठता कळली.
शिवभक्त भालजी पेंढारकरांपासून राजदत्तांपर्यंतचे मराठी मातीतले ऋषीतुल्य दिग्दर्शक जाणून घेतले. जाहिराती करताना शुद्धलेखनाला प्राधान्य दिले.
मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे करताना त्यांचं मराठीपण जपलं. शेकडो मुखपृष्ठांचं रसिकांनी कौतुक केलं. भरुन पावलो.
सिंहावलोकन करताना मी ‘मराठीपण’ जपल्याचा मला अभिमान वाटतो आहे…
राग येतो त्यांचा, जे मराठी असूनही आपल्या दुकानाच्या फलकावरील अशुद्ध मराठीकडे डोळेझाक करतात. आई वडिल मुलांकडून ‘डॅडी, मम्मी’ म्हणवून घेतात. घरी घावण करण्याऐवजी पिझ्झा मागवतात. सुप्रभात म्हणण्याऐवजी ‘गुडमाॅर्निंग’ म्हणतात. बालवाडी ऐवजी केजी, माॅन्टेसरी, प्ले ग्रुप, काॅन्व्हेंटला ‘डोक्यावर’ घेतात. स्वागत समारंभाऐवजी ‘रिसेप्शनला काॅल’ करतात. दवाखाना या साध्या शब्दाऐवजी ‘मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल’ने जीव गुदमरवून टाकतात. रक्तदाब, ह्रदयविकार या शब्दांच्या ठिकाणी ‘हार्ट फेल’ने जीवन संपवून टाकतात. माणूस गेला, वाईट झालं ऐवजी ‘ही इज नो मोअर’ ने सांगता करतात….
अजूनही वेळ गेलेली नाही, आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे, तिचा आपण आवर्जून वापर करु व तिला सर्वश्रेष्ठ ठरवू!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२७-२-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..