अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. डोके कुठल्याही भागात किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते ; परंतु बऱ्याच वेळा डोकेदुखीवर पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. ती पुन्हा पुन्हा होते ; परंतु त्याची वारंवारता , तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत येतात. त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही.
ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.
काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ‘ पेन रिलिव्हर ‘ म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं..
अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.
ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.
— सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुप
Leave a Reply