जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा गुलकंद वर्षभर टिकतो व वापरता येतो.
मी ह्या फुलाचा उपयोग करून बरेच जणांचे मायग्ेनचे त्रास कमी केले आहेत. ज्यांचेकडे हे फुल येते त्यानी जरूर गुलकंद करून ठेवावा.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
Leave a Reply