आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी
प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी….१,
प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका….२,
यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते….३,
यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई
कांहींतरी ते मिळवायचे, याच विचारी रमून जाई….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply