मला हा लेसन शिकवशील का? आणि धडा काढून दाखवला.नातवानं तो तर शिकवलाच आणि ते नेमके कोणते गाणे होते हे त्याला दाखवायला सांगितले आजोबांना. अभ्यासक्रमात काही धडे वेगवेगळ्या कारणांमुळे निवडलेले असतात. तर धडा होता २६ जानेवारी या दिवशी एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका वर्गाला नेहमीच बक्षीस म्हणून ढाल मिळायची ती यंदाही मिळवण्यासाठी एक संगित शिक्षक मेहनत घ्यायचे. यावेळी त्यांनी मिले सुर मेरा तुम्हारा याची निवड केली होती. आणि वेषभूषा केशभूषा वगैरे सर्व काही मुलांना समजावून सांगितले होते. रोज सराव करत असताना एक विद्यार्थी ज्याला थोडी संगिताची जाण होती आणि त्याचा मित्र त्यालाही. ते दोघेही शास्त्रीय संगीत शिकत होते. म्हणून तो पेटी वाजवायचा व एक सुरात गाणी म्हणायचा. रोज सराव सुरू झाला. मुले खूप छान म्हणायची मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणं. आणि दिवसेंदिवस प्रगती होत होती. गुरुजी खूपच खुश होते….
ठरलेल्या दिवशी रंगीत तालीम होती मुले सर्व तयारीनिशी आले होते. पहिले कडवे चांगले झाले. तेव्हा त्या दोघानी ठरवलं होतं तस करायला सुरुवात केली. जो पेटी वाजवत होता त्याने स्वर बदलून टाकला. आणि दुसरा त्याच प्रमाणे गाऊ लागला. आणि बाकीचे सगळे आपापल्या सोयीने आणि स्वरात गाऊ लागले. गुरुजींना समजेना झाले असे का व्हावे? आणि त्यांनी बंद केले मुले घाबरून निघून गेली. दुसर्या दिवशी मुलांना बोलावून घेतले व गुरुजी म्हणाले मुलांनो किती मेहनत घेतली होती आणि बक्षिसाची नव्हे तर तुमच्या कडून खूप मोठी अपेक्षा होती माझी. हे सांगत असताना त्यांना गहिवरून आलं. मग त्या दोघांना पश्चाताप झाला व कबूल केले की त्यांना स्वतःला वेगळा मोठेपणा पाहिजे होता म्हणून त्यांनी असे केले. यावेळी गुरुजी म्हणाले की जिथे अंहकाराची भाषा येते तिथे प्रगती होत नाही. त्यामुळे विनम्रता असेल तरच प्रगती. सूर लय ताल हे सगळे एकत्र नसले तर सगळेच बिघडून जाते. मग ते संगीत असो वा…..
खूप छान वाटले वाचून आणि शिकवताना देखिल. शाळेत याचा व्हिडिओ पूर्वीचा टिव्ही वरचा असेल तर जरुर दाखवावा असे वाटते. या गाण्यात चौदा भाषेचा संगम आहे आणि आता हे सगळे तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. पण काही म्हणा हे गाणं आयुष्यात बरच काही सांगून जातं आणि संस्कारक्षम वयात आणि नंतरही. घर असो की देश एकता नसेल तर सगळेच बेताल बेसूर होऊन जाते.
सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply