नवीन लेखन...

मिल्क कुकर

दध तापवणे हे अनेकांना बरेच कटकटीचे काम वाटते. कारण ते हमखास उतू जाते. नाही म्हणायला आपल्या भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला थोडे दूध उतू घालण्याचा प्रघात आहे. पण असे रोज दूध उतू घालणे कुणाच्याच खिशाला परवडणार नाही.

दुधाचे दर आणखी वाढतच जाणार आहेत. त्यातून वाचण्यासाठी देशाला आता धवलक्रांतीची गरज आहे. भारत हा दूध उत्पादनात आतापर्यंत तरी आघाडीवर होता, पण आता मागणी व पुरवठा यात बरीच तफावत होत चालली आहे.

दूध तापवण्यामागे त्यातील जंतूंचा नाश करणे हा प्रमुख उद्देश असतो. दूध तापवून नंतर ते एकदम थंड करण्याच्या प्रक्रियेला पाश्चरायझेशन म्हणतात व त्यामुळे दूध अधिक काळ टिकते. दुधात ८५ टक्के पाणी व इतर भाग हा मेद, प्रथिने, शर्करा व क्षार यांचा असतो. दुधाचा उत्कलन बिंदू पाण्याच्या १०० अंश सेल्सियस या उत्कलन बिंदूपेक्षा जास्त (अर्ध्या अंश सेल्सियसने) असतो. दुधात जो मेद व प्रथिनांचा भाग असतो तो वरच्या थरात असतो. तो दूध तापायला ठेवल्यावर तयार होणाऱ्या वाफेला बाहेर जाण्यास वाट देत नाही.

साध्या भांड्यात दूध तापवताना ते पाण्याच्या उत्कलन बिंदूपेक्षा जास्त तापमानाला उकळते व जास्त वाफ सायीच्या खाली तयार होते. त्यामुळे सायीचा फुगा फुटतो. नंतर सायीचा पातळ पडदा पुन्हा सांधला जातो. मग पुन्हा त्याखाली मोठ्या प्रमाणात वाफ तयार होते. एक वेळ अशी येते की, सायीचा पडदा खूपच फुगतो व तो भांड्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन दूध थोड्याशा सायीसह उतू जाते.

दूध जेव्हा मिल्क कुकरमध्ये तापवले जाते त्या वेळी यातले काहीच घडत नाही. कारण त्यात दोन भागांची सोय असते व त्या दोन भागांच्या दरम्यान गोलाकार स्वरूपातील रिकामी जागा असते. त्यात पाणी असते. पाण्याचा उत्कलन बिंदू दुधापेक्षा कमी असतो, त्यामुळे पाणी दुधापेक्षा कमी तापमानाला उकळू लागते. पाण्याची वाफ होते, त्यामुळे पाणी व भांडे यांचे तापमान १०० अंश सेल्सियसला स्थिर राहते. परिणामी मिल्क कुकरमध्ये दुधावर साय धरते, पण दुधाचे तापमान त्याच्या उत्कलन बिंदूपेक्षा कमी राहिल्याने वाफेचे बुडबुडे मात्र तयार होत नाहीत. परिणामी सायीचा थर फाटत नाही व दूध उतू जात नाही.

मिल्क कुकर हा स्टील किंवा अॅल्युमिनियम संमिश्राचा बनवलेला असतो. त्यालाही वाफेमुळे निर्माण होणाऱ्या दाबाचे नियंत्रण करण्यासाठी नेहमीच्या कुकरप्रमाणे शिटी असते.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..