गोपाळ विनायक भोंडे यांचा जन्म १८८१ सालात झाला.
गोपाळ विनायक भोंडे हे आद्य व श्रेष्ठ नकलाकार मानले जातात. एकेकाळी त्यांनी बालगंधर्वाप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राला आपल्या नकलांनी वेड लावले होते. गोपाळ विनायक भोंडे लोकमान्य टिळक, भालाकार भोपटकर, शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रँग्लर परांजपे, लोकनायक बापूजी अणे, बॅ. जम्नादास मेहता, रँग्लर परांजपे अशा अनेकांच्या हुबेहूब नकला करत असत. लोकमान्यांसारखीच वेशभूषा करून ते मंचावर येत, आणि लोकमान्यांच्या आवाजात, बोलण्याच्या लकबीत त्यांनी पूर्वी केलेल्या भाषणाची नक्कल करीत. गोपाळ विनायक भोंड्यांच्या चरित्रात त्यांनी त्यांच्या लोकमान्यांच्या बोलण्याच्या लकबीविषयी लिहिलं आहे. राम गणेश गडकरी यांनी ‘भोंडे यांची नक्कल केवळ वरकांती नसून ते त्या व्यक्तीच्या आत्माची नक्कल करतात’, हे काढलेले उद्गार अगदी सार्थ होते.
वामनराव परांजपे यांनी नकलाकार भोंडे : व्यक्ती आणि कला या पुस्तकात या श्रेष्ठ नकलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाची व कलेची ओळख करून दिलेली आहे.
नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे ५ एप्रिल १९६४ रोजी निधन झाले.
पुणे महानगरपालिकेने पुण्यातील प्रभात टॉकीज ते रतन टॉकीज या रस्त्याला आप्पासाहेब भोंडे पथ असे नामकरण केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply