रावसाहेब दानवे पाटील यांचा जन्म १८ मार्च १९५५ रोजी झाला.
साधरणात ३८ वर्षापुर्वी रावसाहेब दानवे यांचा ग्रामपंचायतीचे सरपंच या रूपाने राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर भोकरदन पंचायत समितीचे सभापती, भोकरदन विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले. रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकिर्द भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना जिल्ह्णाचे अध्यक्ष हे रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकिदीर्तील सुरुवातीचे पद होते. त्यांनी भोकरदन पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम केले. विधानसभा सदस्य व नंतर लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी शेती व ग्रामविकासाशी संबंधित संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम केले.
भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे ते उपाध्यक्ष होते. २०१४ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते केंद्रीय मंत्री आहेत.
भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोकरदन खरेदीविक्री संघ, विठ्ठलराव अण्णा सहकारी ग्राहक संस्था, भोकरदन, मोरेश्वर सहकारी खरेदी विक्री संघ, भोकरदन, मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, राजूर, शिवाजी शिक्षण संस्था, जालना जिल्हा दूध संघटना, विवेकानंद शिक्षण संस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्याशी ते संबंधित असून त्यापैकी बहुतेक संस्थांचे प्रमुखपद त्यांनी भूषवले आहे.
त्यांनी आत्तापर्यंतच्या २४ निवडणुकांपैकी २३ निवडणुका जिंकल्या आहेत. सध्या ते मोदी सरकार मध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply