आजच्या दिवशी भारतात प्रथम चित्रपट बघितला गेला, या गोष्टीला आज १२५ वर्षे झाली. या गोष्टीला भारतातील चित्रपटाचा जन्म झाला असे ही म्हणता येईल. कारण ७ जुलै १८९६, रोजी मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
ल्युनिअर बंधू हे फ्रेंच निर्माते होते. ल्युनिअर बंधूनी या कार्यक्रमाचे तिकीट रुपये १ ठेवले होते. टाइम्स ऑफ इंडिया ने या कार्यक्रमाचा उल्लेख “miracle of the century” असा केला होता. या दिवशी The Sea Bath, Arrival of a Train, A Demolition, Ladies and Soldiers on Wheels and Leaving the Factory असे ६ चित्रपट दाखवण्यात आले.
या चित्रपटाच्या कार्यक्रमाला ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि हे चित्रपट पुढे कलकत्ता आणि चेन्नई मध्ये दाखवण्यात आले. दुसरा शो १४ जुलै १८९६ new venue, the Novelty Theatre, मुंबई येथे व तिसरा शो १५ ऑगस्ट १८९६ रोजी केला गेला.
संजीव_वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply