नवीन लेखन...

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे

लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१

कधी जाती ते चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी

खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२

एक एक ते जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं

संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३

हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा

स्थिर राहूनी लपतां लपतां,  खेळांचा तो वाढवी पसारा….४

निशा राणीची मुले ही सारी,  खेळत राहती रात्री बिचारी

उशास बघूनी हसतां हसतां,  निघूनी जाती आपल्या घरी….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..