नवीन लेखन...

मिशन इंपॉसिबल

पुढचा लेख वाचण्याआधी प्लीज हा व्हिडीओ पहाच..
Please its a request.

Video

Ok. Welcome back…
व्हिडिओ पाहताना काही क्षण तुम्हाला टॉम क्रुज असल्यासारखं वाटलं का हो..? खरं सांगा…!
बरं..आता एक काम करा…हा व्हिडिओ पुन्हा पहा..
पण यावेळी फक्त साउंड म्यूट करा आणि मग पहा..
नाही.ssss…का हो हसलात ना..?
मला तुमच्या चेहऱ्यावरचे मिष्कील हसू दिसतय…
समजलं ना, काय म्हणायचय मला..?
Message delivered in 5 seconds.

असो..नमनाला घडाभर तेल यासाठीच की साक्षात टॉम क्रुज जरी स्क्रीनवर साडे तीन मिनीट सतत impossible दिसणारे Missions पार पाडताना दिसत असला तरी या व्हिडिओची मजा याच्या BGM मुळे, याच्या संगीतामुळेच आहे…खरय ना..?
हो तीच ती.. विश्व प्रसिद्ध MI थीम…!!
Mission Impossible…
फक्त सिनेमाचे नाव कानावर पडले तरी ते संगीत कानात सुरु होते..
‘ढॅण ढॅण ढॅण..ढॅडॕन..ढॅण ढॅण ढॅण…….’
1996 मधे मिशन इम्पॉसीबलचा(MI) पहिला भाग आला.
तगडा हँडसम टॉम क्रुज तसा आधीच टॉप गन पासून ॲ‍क्शन हिरो म्हणून लोकांना खूप आधीपासूनच आवडला होता. पण MI ने जगभर इतकी जबरदस्त कमाई केली की स्वतः टॉमने MI Franchise चे हक्क घेत 1996 ते 2018 या 22 वर्षात MI-2, MI-3, MI-Ghost Protocol, MI-Rogue Nation, MI-Fallout असे तब्बल सहा सिनेमे या फ्रँचाइज अंतर्गत काढलेत. मला वाटतं जेम्स बाँड नंतर सर्वात लोकप्रिय फ्रँचाइज ही MI सिरीजच असावी.

Impossible Mission Force (IMF) या अमेरिकन सरकारच्या टास्क फोर्सचा एजंट ‘इथन हंट’ (क्रुज) आपल्या सहकाऱ्यांसह अशा काही साहसी मिशन्स करतो की याचे सिनेमे पाहताना तुमचा जीव -हृदयातून उडी मारुन बाहेर येतो की काय असं वाटावं.

Edge of the seat थ्रील काय असतं याचं मुर्तीमंत प्रात्यक्षिक म्हणजे ही MI series.

MI series मधे दिग्दर्शक बदलले, लेखक बदलले, हिरोइन बदलल्या..फक्त दोन गोष्टी चोवीस वर्षानंतरही बदलल्या नाहीत ते म्हणजे टॉम क्रुज आणी MI चे थीम संगीत.

MI सिरीजच्या या थिमचा जनक आहे लालो शिफरीन हा अर्जेंटाइन पियानीस्ट ज्याने ही अजरामर थिम चक्क 1967 मधे निर्माण केली होती. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाउक नसेल की मिशन इम्पॉसिबल या कल्पनेचा टेलेव्हिजन अवतार चक्क 1967 मधे अमेरिकेत प्रसारीत झाला होता ज्याचं हे टायटल म्युझीक लालो शिफरीन ने दिले होते.
म्हणजे पहा..आज या थीमला पन्नास वर्षे होउन गेली आहेत.

तरीही आजही MI सिरीजची कोणतीही फिल्म अपण या थीम संगीताशिवाय विचारही करु शकत नाही..नाही का..?
हाॕलीवूडने काही कमाल थिम्स जगाला दिलेत. MI थीम त्यापैकीच. एक काळ होता जेंव्हा MI ट्युन ही कित्येक जणांची रिंग टोन वा कॉलर ट्यून होती. लोक मुद्दाम वाजू द्यायचे ती ट्यून आणि आरामात फोन घ्यायचे. मीही ती रिंगटोन वापरलीय एकेकाळी…
लेखाच्या शेवटी काही लिंक्स देतोय..

स्वतः लालो शिफरीन ने कंडक्ट केलेला ऑर्केस्ट्रा (आणि अफलातून पियानो वादन) असलेली एक क्लिप आहे. मला आवडलेली अजून एक ऑर्केस्ट्राने वाजवलेही थीमचीही एक क्लिप आहे.

So get ready for the mission….here we go..
ढॅण ढॅण ढॅण..ढॅडॕन..ढॅण ढॅण ढॅण…….’

लेख कसा वाटला ते नक्की सांगा. MI आणि त्याच्या थिम बद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर जरुर सांगा…

https://youtu.be/H5SYHcD_CYA

https://youtu.be/AQsx4Fr8wqU

https://youtu.be/vccYZjRvJ0M

PS- This Post will self-destruct in 5 seconds

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..