नवीन लेखन...

मिशन राणी गंज

काल युट्युब वर मिशन राणी गंज हा सुंदर सिनेमा पाहिला. मी शक्यतो सिनेमा माझी मुलगी प्राजक्तासोबतच बघत असते, म्हणजे मग छान शेअरिंग, गप्पा होतात. पण आता ती इथे नसल्यामुळे एवढ्यात एकटी एकटी मूवी बघते.

काय नाही या सिनेमांमध्ये…!कसलेही उत्तान भडक प्रदर्शन नाही, अंगचटीला येण नाही, आखूड कपडेही नाहीत. तरीही हा एक नितांत सुंदर सिनेमा आहे, असे पाहिल्यावर मला वाटले. अर्थात असे सिनेमाज शक्यतो फ्लॉप असतात. तसा हाही फ्लॉप मुव्ही आहे.एका सत्य घटनेवर आधारित असलेला हा मूवी, यामध्ये… जीवन मरणाची लढाई आहे, माणुसकीचे उत्तुंग दर्शन आहे, माणसाचा हिणकस नीचपणा सुद्धा आहे. इतरांच्या जीवाची पर्वा न करता केलेले कुरघोडीचे राजकारण आहे. स्वतः जगण्यासाठी आणि दुसऱ्याला जगवण्यासाठी असलेली माणसाची धडपड आहे, कर्तव्याप्रति उत्तुंग निष्ठा आहे.

मी सिनेमा पाहून खूप रडले. अर्थात सिनेमा मुळीच रडका नाही. पण एखादे गोल ठरवायचे आणि ते मिळवण्यासाठी अविश्रांत मेहनत करायची. आणि मग ते मिळवल्यावर, अचिव झाल्यावर, होणारा आनंद, तो मिळवण्यापूर्वीची काळजी, धाकधूक, प्रयत्नांच्या पराकाष्ठेचा तो प्रवास, या सगळ्यामुळे मनावर आलेला ताण, हा अश्रुतून म्हणजे आनंदाश्रुतून निघतो तसं काहीस माझं झालं होतं. अक्षय कुमार हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. या सिनेमात नेहमीप्रमाणे त्याने खूप सुंदर अभिनय केला हेही खरे. सशक्त कथा, दमदार अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन असले की, माणूस सिनेमा बघत नाही फक्त, तर तो सिनेमा जगतो. मी हा सिनेमा काल सव्वा दोन तास जगले. अजूनही त्याची धुंदी मनावरून उतरली नाही.

आपल्याला आवडलेली गोष्ट दुसऱ्याशी शेअर केल्यावर छान वाटते ना! म्हणून मी आपल्याशी हे शेअर केलं.
(माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक असलेले, अनिल बर्वे, यांचे अकरा कोटी गॅलन पाणी, हे पुस्तक, त्याची कथा याच्याशी मिळती जुळती आहे, पण ते अजून मला वाचायला मिळालं नाही सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे.)

-नीतू (सुनिता दरे)

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखिका नीतू (सुनिता दरे) ह्यांनी लिहिलेला हा लेख

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..