मित्र’
मात्र ध्वनि नाही,
मात्र शब्द नाही
तो एक अर्थ आहे,
आणि अर्थच नाही तर
एक भावार्थ आहे,
जो वाचला जाऊ शकत नाही
जो ऐकला जाऊ शकत नाही
जो केवळ समजला जाऊ शकतो,
काय ती पूजेतील फक्त एक घंटी आहे?
का तो फक्त अंगाऱ्याचा एक रंग आहे?
नाही
तो अनेक तुकड्यात विभागून सुद्धा
एकसंध आहे,
जे सार्थक करतात
माझ्या अस्तित्वाला !!!
त्या तुकड्यातील सारांश घेत
मी भविष्याचा शोध घेत
वाटचाल करीत आहे,
कारण
ते पुन्हा देतील चंद्र ताऱ्यातील संगीत
ते पुन्हा भरतील चित्रात रंग
पुन्हा मिळेल ती संजीवनी
जी मना मनाला जोडेल,
याच साठी मित्र
‘मित्र’ मात्र ध्वनि नाही,
मात्र शब्द नाही
तो एक अर्थ आहे,
आणि अर्थच नाही तर
एक भावार्थ आहे !!!
*****
मूळ हिंदी कविता-
रेखा राजवंशी, सिडनी ऑस्ट्रेलिया
Rekha Rajvanshi
मराठी अनुवाद-
विजय नगरकर
vpnagarkar@gmail.com
Leave a Reply