सर्व म्हणतात भावा आमच्यावर पण काही लिहत जा त्या माझ्या मित्रांसाठी दोन शब्द…
घरच्यांना खोट बोलून जो मित्राच्या भांडणाला पहिले जातो तो मुलगाच असतो.
चार चौघात मुली रडू शकतात पण जो ओठावर हसू ठेऊन अश्रू लपवतो तो मुलगाच असतो.
ज्याला आयुष्यात स्वतः कमवून चार जणांना सांभाळायचं असत तो मुलगाच असतो.
स्वतःची सुख विसरून दुसऱ्याच्या दुखात सहभागी होतो तो मुलगा! टपोरी, गुंड, मवाली अश्या अभ्यास न करता ज्याला लोकांकडून पदव्या मिळतात तो मुलगाच असतो.
अन मित्राच्या अंगावरचा वार स्वतःच्या छातीवर घेतो तो मुलगाच असतो.
त्यालाही मन असत ओ पण ते कुणाला दिसत नाही कारण तो ते कधीही दाखवत नाही तो मुलगाच असतो.
अन अहोरात्री एखाद्याच्या मदतीला जो धावून जातो तो मुलगाच असतो.
पृथ्वीवर तर सर्वांनाच नाज असतो राव पण तिला जो सूर्य ऊर्जा देतो तो मुलगाच असतो आपल्या मित्राला सोड रे कशाला टेन्शन घेतो मी आहे ना असा जो धीर देतो तो मुलगाच असतो.
Leave a Reply