९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्राला नवनिर्माणाचं स्वप्न दाखवत राज ठाकरे यांनी एका नव्या राजकीय पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. राज ठाकरेंच्या करिष्म्यावर शिवसेनेतून बंडखोरी करत शेकडो मावळे बरोबर आले होते.
२००७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी हाती घेतलेला विकासाचा मुद्दा लोकांना फारसा भावला नाही आणि महापालिकेत अवघे ७ नगरसेवक निवडून आले. या पराभवातून मनसेनं धडा घेतला आणि २००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. २०१२ च्या मुंबई महापालिकेत मनसेचे २७ नगरसेवक निवडुन आले होते. त्याच वेळी मनसेची नाशिकमध्ये सत्ता आली. खऱ्या अर्थानं २००९ ते २०१२ हा मनसेचा सुवर्णकाळ ठरला.
२०१४ च्या मोदी लाटेत तर मनसेचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी राज ठाकरे व त्यांचा पक्ष लोकांच्या मनात घर करुन आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply