महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. आपल्या वक्तृत्वानच्या जोरावर लाखो चाहत्यां मध्ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत सीताराम ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची बहीण लागतात.
राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राजचे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टून पट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.
अनेक शेतकऱ्यांना नेहमी वाटत आलाय कि राज ठाकरेंनी शहरांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष ठेऊन काम केल्यास त्यांच्या बाजूने शेतकरी वर्गाची मोठी ताकद तयार होईल. राज ठाकरे हे आजतागायत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे. त्यांच्या सभेला जमणारी गर्दी व इंटरनेटवर त्यांना सर्च करणारा सर्वात मोठा वर्ग त्यांचाच चाहता आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply