|| हरी ॐ ||
मोबाईल !
खरा एखादाच कॉल,
बाकी “मिस” कॉल !
होती गंमत नवीन तेंव्हा
होता,
आता असतो कोणाच्याही हाता !
होते प्रदूषण ठणठणा
बोलल्याने,
टाळतात प्रदूषण गुलुगुलू
बोलण्याने !
गुलुगुलू बोलण्याचे होते
राजकारण,
अनर्थ होतो विनाकारण !
बोलताना भान आम्हां नसते,
ठेवायचे असते कोणाला कळते !
मोबाईलने जग झाले सोबती,
प्रदूषणाच्या “लहरी” आमच्या
सोबती !
कळत असत पण वळत नसतं,
असच आमच रोज असतं !!
जगदीश पटवर्धन, वझिरा,
बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply