नवीन लेखन...

मोबाईल

नमस्कार मैत्रिणींनो !आज आपण गप्पा मारणार आहोत, तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मोबाईल विषयी.

तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? आता तर एक वर्षाच्या मुलालाही आई म्हणण्या आधी मोबाईल म्हणता यायला लागलय! अगदी खरं, पण याबाबतीत काही नव्याने विचार करावा असं वाटलं, आणि आपली आई – आजी यांनाही मोबाईल सहजगत्या वापरता यावा म्हणून हा लेखन प्रपंच !

प्रथम तर नवीन मोबाईल विकत घेताना प्राधान्य कशाला द्यावे हे ठरवले पाहिजे. माझ्या मैत्रिणीकडे तो आहे, म्हणून मीही घेते, असा विचार करू नये. आपण या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर कसा आणि किती कामांसाठी करणार आहोत हे आधी ठरवावे. कारण पूर्वीसारखा तो फक्त कॉलिंग साठी लागणारा फोन न राहता स्मार्टफोन झालेला आहे.
तर मोबाईल विकत घेताना महागडा मोबाईल घायचा म्हणजे चांगले फीचर्स मिळतात असं अजिबातच नाही.

तुमचा वापर कसा आहे त्यावर मॉडेल ठरवावं, म्हणजे असं कि सतत प्रवासाचे काम असणार आहे आणि बॅटरी चार्ज करायला जागा नाही त्यांनी जास्त बॅटरी बॅकअप वाले आणि पटकन बॅटरी न उतरणारे मोबाईल घ्यावेत. ज्यांचा वापर करण रफ टफ आहे त्यांनी टिकाऊ आणि मजबूत मोबाईल बॉडी ला प्राधान्य द्यावे. सध्या काही लोकं स्टेटस सिम्बॉल म्हणूनही याचा वापर करतात, त्यावेळीस ब्रँड महत्वाचा ठरतो. काहींना मोबाईल वर गाणी ऐकण्याची खुप आवड असते, अशांनी चांगल्या साऊंड क्वालिटी चे, लाऊड आवाजाचे फीचर्स असलेले घ्यावेत. सध्या सेल्फी ने तर अक्षरशः सर्वाना वेड लावले आहे. त्यांच्यासाठी फ्रंट कॅमेरा किती मेगा पिक्सेल चा आहे हे पाहणं महत्वाचं ठरत. काहींना त्यावर व्हिडिओ नि मूवी बघायची आवड असते, अशा व्यक्तींनी मोठ्या स्क्रीन चे मोबाईल घ्यावेत. हे साधारण आडाखे आहेत, पण शेवटी आपल्याला आवडेल तो नि खिशाला परवडेल असा हा लाडका मोबाईल घ्यावा. कितीही पारखून घेतला तरी किमान 3-4 वर्ष नीट वापरला तर तो टिकू शकतो, आणि यातल्या टेकनॉलॉजि दिवसागणिक बदलत असतात, त्यामुळे तो अपडेटेड ठेवावाच लागतो किंवा नवीन घ्यावा लागतो.

आता मनासारखा मोबाईल घेतला, त्याच्या पुढे काय करावं तर सर्व प्रथम कॉन्टॅक्ट लिस्ट भरावी. सध्या आपण पूर्णपणे मोबाईल मधल्या नंबर्स वरच अवलंबून असतो, असं मात्र करू नये. किमान 4 तातडीचे आणि जवळचे नंबर्स तोंडपाठ असावेत आणि आपल्या जवळच्या, पर्स मधल्या डायरीत नोंद केलेले असावेत. कारण बहुतेक मोबाईल ना सध्या अनलॉक सिस्टिम असते. त्यामुळे इमरजंसी मध्ये दुसऱ्या व्यक्तीला आपली ओळख लागत नाही किंवा संपर्क होत नाही.
मोबाईल म्हणजे ऍप चं घर असं म्हणायला हरकत नाही.

पहिले वॉट्सअप, ज्याने मेसेज तर्फे आपण इतरांच्या संपर्कात राहू शकतो, त्यानंतर युट्युब, यामुळे हवी ती माहिती, करमणूक आपण विडिओ च्या साहाय्याने पाहू शकतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारखी ऍप आपल्याला सोशल राहायला मदत करतात.

टू डू लिस्ट ऍप, ज्यामुळे रोजच्या कामाची यादी सकाळीच बनवून ठेवली म्हणजे त्यातून आपली कामे वेळेवर आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.

पेमेंटशी संबंधित ऍप जसे कि paytm, मोबिक्विक, भीम यामुळे घरबसल्या आपण सगळ्या प्रकारची बिले भरू शकतो. फक्त यासाठी सुरुवातीला माहितगार व्यक्तीकडून याच्या वापराविषयी सविस्तर माहित करुन घ्यावे. वयस्कर व्यक्तींना याचा नक्कीच फायदा होतो.

शिवाय स्त्रियांसाठी खूपच उपयुक्त असे ऍप सध्या उपलब्ध असतात. जसं कि मिल प्लॅनर आहे, डाएट फॉलो ऍप, हेल्थ विषयक ऍप, मंथली डेट रेकॉर्ड, सौन्दर्य विषयक, रोजचा जमाखर्च लिहता येईल अशी बरीच ऍप उपलब्ध आहेत.
यामध्ये डायरी असंही एक ऍप आहे बरं का, म्हणजे आपली रोजची दैनंदिनी आपण त्यात लिहून ठेवू शकतो, जेणेकरून दर वर्षाची वेगळी डायरी बाळगण्याची गरज नाही आणि त्याला अनलॉक करण्याची सुविधा असल्याने कुणी चोरून वाचेल याचीही भीती नाही.

मराठी लोकांसाठी यात मराठी कॅलेंडर ही डाउनलोड करू शकतो, त्यातही महत्वाच्या नोंदी करता येतात.

याशिवाय यामध्येच गुगल ही आपोआप येतच, तो तर अलीबाबा चा अनंत माहितीचा खजिनाच म्हणावा लागेल. जिथे हवे ते शब्द टाईप केल्यावर आपल्याला त्याविषयी सगळी माहिती, फोटो मिळू शकतात.

आपल्याला अनोळखी पण इच्छित स्थळी जायचे असेल तर जीपीएस सिग्नल द्वारे आपण गूगल मॅप्सच्या आधारे रस्ताही शोधू शकतो.

आता असा सगळा जामानिमा करुन झाला, कि हा मोबाईल हळूहळू मेसेजेस, फोटोस, व्हिडीओस यांनी रोजच्या रोज भरायला सुरुवात होते, आणि सणासुदीला तर पुरंच येतो शुभेच्छांचा ! आमच्या शेजारच्या काकुंचीच मोठी पंचाईत झाली यामुळे. कोणताही नवीन फोटो त्यांना काढता येईना, कारण स्टोरेज फुल असा मेसेज सारखा यायला लागला. त्यांनी नवीन मोबाईल घायचा ठरवला कारण हा मोबाईल भरला, यावर मी हसावं कि रडावं मला कळेना. तर यावर एक उपाय असा करता येईल कि जसं आपण घराच्या साप्ताहिक स्वछतेसाठी वेळ देतो तसाचं एक दिवस मोबाईल स्वछतेसाठीही ठरवला पाहिजे. म्हणजे त्यातील अनावश्यक नको ते फोटो आणि मेसेज डिलिट करावेत. म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी चांगली राहून मोबाईल फास्ट वापरता येतो. आणि यातला डेटा आपल्याला कॉड द्वारे पीसी किंवा लॅपटॉप मधेही सेव करून ठेवता येतो. या उपकरणाची आतून जशी स्वछता होते तशी बाहेरूनही किमान साप्ताहिक स्वच्छता करावी. जसे कि कव्हर काढून सॅनिटायझर ने पुसून घेता येईल, कॅमेरालेन्स स्वच्छ कराव्यात, कारण हा आपण सतत जवळ बाळगून असतो, त्यामुळे जशी टीव्ही, लॅपटॉप यांची काळजी घेतो तशीच याचीही घेतली पाहिजे.

शेवटी जाता जाता एक महत्वाचे सांगावेसे वाटते ते असे कि सध्या मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, पण आपल्या सोयीसाठी मोबाईल आहे, मोबाईलसाठी आपण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. जसा बायका मंगळवारी, शुक्रवारी उपवास करतात तसाच उपवास मोबाईल किंवा सोशल मीडिया चाही करून बघा, एक प्रयोग म्हणून किंवा गंम्मत म्हणून, तुमचाच फरक तुम्हांला नक्कीच जाणवेल. नवीन वर्षाचं रेसोलुशन म्हणूनही ठरवू शकता.

आणि एक कळकळीची नम्र विनंती शक्यतो लहान मुलांना यापासून जास्तीत जास्त दूर ठेवता आलं पाहिजे, अभ्यास हे कारण असेल तरी तेवढ्यापुरतं वापरून बाकी मैदानी खेळांसाठी प्रवृत्त केलं पाहिजे. ते कसं करता येईल याबाबत पुढे कधीतरी आपण नक्कीच गप्पा मारुयात ! सध्या साठी एवढंच !

–वर्षा कदम.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..