नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे.
शेकडो वर्षाची परंपरा असलेले सदर गणेश मंदिर गोदातीरी पूर्वाभिमुख वसलेले आहे गणेशाच्या बाजूला ऋध्दि-सिध्दी यांच्या मूर्ती असून, बाजूलाच काशी विश्वेश्वराच मंदिर असलेले हे एकमेव प्राचीन देवस्थान आहे.
प्रसिध्द २१ गणेशांमध्ये सदर गणेशाची गणना होत असल्याने पूर्वी नाशिकचे ग्रामदैवत म्हणूनही या गणेशाकडे पाहिले जायचे. गणेश कोष, पंचवटी दर्शन यात्रा, गोदावरी माहात्म्य अशा विविध पुस्तकांमध्ये मोदकेश्वराचा उल्लेख आल्याने संपूर्ण भारतातून येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
या गणेश मदिरांच्या जीर्णोध्दार विलास क्षेमकल्याणी यांच्या पूर्वजांनी केला. तेव्हापासून आजतागायत क्षेमकल्याणी यांची नववी पिढी मंदिराचे कामकाज पाहत आहे. दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी भल्या पहाटे पासून गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.
— देवेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
(महान्यूज मधील लेखाच्या आधारे)
Leave a Reply