नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ४

Modern American Agriculture and Animal Farming - Part-4

अमेरिकन शेतीउत्पादनाचा पशुसंवर्धन हा अविभाज्य घटक आहे. याची चार मुख्य अंगे म्हणजे – बीफ (गोमांस) उत्पादन, दुग्धउत्पादन, वराहपालन आणि कुक्कुटपालन.

अमेरिकन आहारातल्या प्रथिन (protein) घटकांचा विचार केला तर त्यात अव्वल नंबरावर आहे बीफ (गोमांस). अमेरिकन लोकांचे स्टेक आणि हॅंबर्गर्सचे वेड तर काही विचारायलाच नको. त्यामुळे बीफ उत्पादनासाठी विशिष्ट प्रजातीच्या गाई गुरांचं संगोपन, हा अमेरिकन शेतीमधला सर्वात मोठा घटक असावा यात काही नवल नाही. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील एकूण फार्म्सपैकी तब्बल ३१% फार्म्स हे बीफ संगोपन करणारे आहेत. बीफ संगोपनाचा हा उद्योग (industry), १० लाखांहून अधिक घटक फार्म्स आणि रॅंचेसचा मिळून झालेला आहे. या बीफ फार्म्सचे वैशिष्ट्य म्हणजे, या १० लाख फार्म्सपैकी तब्बल ९७% फार्म्स हे घरगुती स्वरूपाचे आणि छोटेखानी आहेत. यापैकी बहुतेक (७९% ) फार्म्सवर, ५० किंवा त्याहून कमी जनावरे असतात. अर्थात भारतीय संदर्भात असे फार्म्स मोठे समजले जात असले, तरी अमेरिकन फार्म्सच्या तुलनेत त्यांना छोटेच म्हणायला हवे. नवरा बायको, वडील मुलगा, भाऊ भाऊ, अशा घरगुती साच्यांमधे हे फार्म्स चालवले जातात. बीफ फार्म्सची ही कौटुंबिक पार्श्वभूमी खूप जुनी आहे आणि बहुतेक फार्म्स हे पिढ्यान पिढ्या एकेका घराण्यात चालत आलेले असतात.

२००९ साली अमेरिकेमधे सुमारे ९४.५ दशलक्ष (94.5 million) बीफ गाई गुरे होती. २००८ साली ३४.४ दशलक्ष बीफ जनावरांची रवानगी कत्तलखान्यात करण्यात आली आणि त्यापासून २६.६ अब्ज पाउंड्स (26.6 billion pounds) एवढ्या गोमांसाचे उत्पादन करण्यात आले. २००८ साली अमेरिकन ग्राहकांनी बीफवर ७६ अब्ज डॉलर्स खर्च केले. त्यासाली अमेरिकन माणसांनी दरडोई ५९.९ पाउंड बीफ खाल्ले तर ५९.२ पाउंड चिकन !

१९६० साली ३.९ दशलक्ष बीफ फार्म्स १८३ दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवठा करत होते, तर २००७ साली २.२ दशलक्ष फार्म्स सुमारे ३०० दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवत होते. म्हणजेच या ४७ वर्षांत, बीफ फार्म्सची संख्या १.७ दशलक्षांनी घटली, परंतु याच कालावधीमधे अमेरिकन लोकसंख्या मात्र ६४% वाढली. १९६० च्या दशकामधे बीफ फार्म्सचे सरासरी आकारमान २९७ एकर्स होते, ते वाढत वाढत २००७ साली ४१८ एकर्स एवढे झाले होते. बीफ फार्म्सच्या वाढणार्‍या आकारमानाबरोबरच, पशुसंगोपन, पशुआहारशास्त्र यांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे, बीफ जनावरांची उत्पादन क्षमता वाढून ती अधिकाधिक धष्टपुष्ट होऊ लागली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर १९९० च्या दशकात, एका बीफ जनावरापासून सरासरी ४०० पाउंड बीफ मिळत होतं, तर २००८ साली, एका बीफ जनावरापासून ६३७ पाउंड बीफ मिळू लागलं आहे.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..