प्रा. विनायक आंबेकर, पुणें यांचा व्हॉटसऍपवरुन आलेला हा लेख वाचकांसाठी शेअर केला आहे.
न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्व सामन्य नागरीक बंधू भगिनीं साठी एक विस्तृत स्पष्टीकरण –
1. जोपर्यंत भाजपा वाजपेयींच्या पुरोगामी धोरणावर व प्रभू श्रीरामाच्या सहिष्णू धोरणावर विश्वास ठेवून चालत होती तोपर्यंत भाजपाला कधीही संपूर्ण बहुमत मिळवता आले नाही.
2. एकाबाजूला हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करूनही काँग्रेस आपल्या भ्रष्टाचारी नेत्यांना अभय देत राहिली तर दुसऱ्या बाजूला पक्षनिधी म्हणून केवळ एक लाख रुपये घेताना स्टिंग ऑपरेशन मध्ये पकडले गेल्यामुळे बंगारु लक्ष्मण यांना पदावरून हटवताना भाजपाने क्षणाचाही विलंब लावला नाही.
एवढे करूनही भाजपाला निवडणुकीत काय मिळाले ?
3. कोणताही भक्कम पुरावा नसताना खोट्या शवपेटी घोटाळ्यात अडकवून तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना टार्गेट करण्यात आल्यानंतर भाजपाकडून लागलीच त्यांचा राजीनामा घेण्यात आला.
निवडणुकीत भाजपाला काय मिळाले ?
4. कर्नाटकातील भाजपाचे बाहुबली नेते येदूरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागताच त्यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले..
निवडणूक निकालात भाजपाला काय मिळाले ?
त्यानंतर दिल्लीच्या क्षितिजावर उदय झाला तो नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा ….!
1. काळाची गरज ओळखून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या तत्वाने चालणाऱ्या भाजपाला ते कर्मयोगी प्रभू श्रीकृष्णांच्या मार्गावर घेऊन आले. कारण श्रीकृष्ण अधर्मींना संपवताना कोणतीही भिडभाड ठेवत नाहीत…
छळ करणाऱ्याला छळाने, कपटी असेल तर कपटाने आणि दांभिक असेल तर दांभिकतेने देशद्रोही, धर्मद्रोही संपवणे हेच श्रीकृष्णांचे एकमेव उद्दिष्ट होते.
त्यामुळेच ते अर्जुनाला मोह माया सोडून केवळ कर्म करण्याची शिकवण देतात..
2. एकीकडून पाकिस्तान तर दुसरीकडून चीन, एकीकडून दहशतवाद तर दुसरीकडून नक्षलवाद, भारतात राहून ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणारे असोत किंवा देशाचा पैसा खाऊन ढेकरही न देणारे भ्रष्टाचारी नेते असोत. वर्तमान परिस्थितीत देश शेजारील तसेच अंतर्गत दुश्मनांनी घेरला गेलेला आहे. देशाविरोधात विविध प्रकारची कट-कारस्थानं रचली जात आहेत.
3. त्यामुळे ही वेळ नैतिकतेचे पोवाडे गात बसण्याची नाही,या बाह्य तसेच देशांतर्गत देशद्रोही शक्तींना जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर सत्ता राखल्याशिवाय पर्याय नाही…मग त्यासाठी साम-दाम-दंड-भेद यांपैकी गरज पडेल त्या गोष्टीचा वापर करण्यालाही पर्याय उरत नाही.
सत्तेशिवाय शहाणपण चालत नसते त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी उद्दिष्ट स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे.
कर्णाचा अंत करताना त्याचा केविलवाणा चेहरा व डोळ्यातून येणारे अश्रू बघत बसलो तर त्याचा वध केला जाऊ शकत नाही…
4. लक्षात ठेवली पाहिजे ती फक्त अभिमन्यूच्या हत्येवेळी कर्णाने दाखवलेली अनैतिकता.
कर्णाच्या रथाचे चाक जेंव्हा गाळात अडकून पडले होते तेंव्हा प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते
पार्था तू बघत काय बसला आहेस? बाण चालव आणि या अधर्मीचा अंत कर.
संकटात सापडलेला कर्ण भगवान श्रीकृष्णांना दयेची याचना करत म्हणाला,”हा अधर्म आहे’.
तेंव्हा श्रीकृष्णांनी त्याला सुनावले होते…
अभिमन्यूला कपटाने घेरून मारणाऱ्याच्या व भर सभेत द्रोपदीला वेश्या संबोधणाऱ्याच्या तोंडी अधर्माच्या गोष्टी शोभा देत नाहीत.
5. आजच्या राजकीय युद्धात जेंव्हा जेंव्हा संविधान वाचविण्याची किंवा सहिष्णुतेची आवई उठवली जाते तेंव्हा आपण पुन्हा महाभारत युगात गेल्यासारखे वाटते ..
विश्वास ठेवा जशी महाभारतातल्या अर्जुनाकडून कोणतीही चूक झाली नव्हती तसा वर्तमान अर्जुनही कोणतीही चूक करणार नाही.
त्यामुळे मोदी असोत की अमित शहा…हे राजकीय युद्ध जिंकण्यासाठी ते जे काही करत आहेत ते सर्व योग्यच आहे.
6. अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे एका मताचा बंदोबस्त न करता आल्याने आत्मसमर्पण करणे आज परवडणारे आहे का ?
आपल्या राजकीय नैतिकतेपायी केवळ एका मताने सरकार सोडून देशाची सूत्रे पुन्हा त्याच देशद्रोही शक्तींच्या हातात देणे योग्य होते का ?
अशी नैतिकता देशाच्या फायद्याची आहे का ? मधल्या काळात देशाचे किती आर्थिक,सुरक्षा विषयक नुकसान झाले हे आपण पाहिले नाही काय ?
7. नैतिकता-नैतिकता खेळण्याचे दिवस कधीच सरलेत…कारण समोर उभे ठाकलेले शत्रू नैतिकतेच्या लायकीचेच नाही…या नतद्रष्टांचे समूळ उच्चाटन हाच एकमेव पर्याय. आज सुदैवाने आपल्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या रुपात मिळाले आहेत हे लक्षात घ्या. देश सुरक्षित करण्या साठी त्यांना साथ द्या.
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम !
— प्रा. विनायक आंबेकर, पुणें
Leave a Reply