नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो.
या माझ्या खोडीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो व माझ्या हाती फार मनोरंजक माहिती लागली व नांव किंवा आडनांवात अर्थ असतो हे मला पुन्हा एकदा जाणवले.
‘मोदी’ हे आडनांव ‘मुदाअी’ या अरबी शब्दापासून तयार झाले आहे व याचा मुळ अर्थ ‘विश्वस्त,खजीना सांभाळणारा, दिवाणजी किंवा कारभारी’ असा आहे. राजाच्या वतीने हेच ‘मुदाअी’ राज्याचा कारभार समर्थपणे हाकायचे. पुढे पुढे संस्थाने खालसा झाल्यावर ‘मुदाअी’ धान्याचा व्यापार सुरू केला व धान्याचे व्यापारी ते मुदाअी असा अर्थ या शब्दाला प्राप्त झाला.
‘मुदाअी’ हा अधिकारदर्शक शब्द पुढे ‘मोदी’ असा आडनांवाच्या रूपाने स्थिर झाला. आपल्या देशातील बहुसंख्य आडनांवे ‘व्यवसाया’वरूनच आलेली आहेत. महाराष्ट्रातही मोदी, गांधी अशी आपल्याला गुजराथी वाटणारी आडनांवे सापडतात ती प्रांतावरून आलेली नसून व्यवसायावरून आलेली आहेत.
‘मोदी’ या आडनांवात वर दिलेला अर्थ नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सिद्ध करून दाखवला आहेच व आता देशातही ते हा अर्थ खरा करून दाखवतील असा विश्वास आहे.
-गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply