मोगऱ्याचे रूप देख
फुलूफुलून मोहवी
लगे त्यास न ओळख
गंधात ओढचं मायावी
अशा सुंदर कोमल
त्याच्या पाकळ्या नाजूक
किती जपलं जपलं
गुज सांगे जरा वाक
शुभ्र वस्त्रात कि शोभे
दिठी भरून हे सुख
झाडे अनेक सोबती
तरी रुबाब त्याचा लाख
माझ्या अंगणी गं नांदे
त्याचे कितीक बहर
त्याच्या छायेत विसावे
माझ्या मनीचा गं मोर
अशा कळ्या मोगऱ्याच्या
द्याव्या घ्याव्या गं ओंजळा
सुगंधाने अलौकिकाच्या
होई जगणं सोहळा!!
— वर्षा कदम.
Leave a Reply