नवीन लेखन...

दाते पंचांग’चे मोहन दाते

सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. आता ‘दाते पंचांग’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या पंचांगाची धुरा नाना दाते यांचे नातू आणि पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांचे पुत्र मोहनराव दाते यांच्यावर आहे. १९७७ सालापासून मोहनराव दाते या व्यवसायात आहेत. १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. त्यांचा जन्म ११ जुलै १९५४ रोजी झाला. पंचांग कार्यात अधिकारवाणीने भाष्य करणारी व्यक्ती म्हणून मोहनराव दाते यांनी नावलौकिक प्रश्नप्त केला आहे. मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल नुकतीच दिल्लीच्या ‘जैन प्रश्नकृत भाषा भवन’ या संस्थेने घेतली आणि मोहनराव दाते यांची आचार्य कुंदकुंद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या आधी सोलापूरचे डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांची त्यासाठी निवड झाली आहे. जैन समाजाशी संबंधित असलेल्या संस्थेने पंचांगक्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल घेऊन कुंदकुंद पुरस्कारासाठी त्यांची निवड केली हे विशेष. एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे येत्या ३ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात आचार्य श्री विद्यानंदजी आणि बेळगावचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित बाहुबली उपाध्ये यांच्या उपस्थितीत मोहनरावांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित आदी विषयातील लोकोपयोगी अभ्यासासाठी आणि या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मोहनरावाची या पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थच मानावी लागेल. यंदाच्या वर्षी २१ जून रोजी ज्योतिषी म. दा. भट गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. आता कुंदकुंद पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मोहनराव दाते यांनी ‘दाते पंचांग’ लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग, कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. पंचांगकर्ते कै. लक्ष्मणशास्त्री दाते, कै. धुंडीराजशास्त्री दाते, कै. श्रीधर लक्ष्मण दाते यांनी लोकप्रिय केलेले ‘दाते पंचांग’ आता मोहनराव दाते यांनी आणखी लोकप्रिय केले आहे. मोहनरावांच्या समवेत त्यांचे पुत्र ओंकार आणि श्रीधर लक्ष्मण दाते यांचे पुत्र विनय हेही या क्षेत्रात आहेत. पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेऊन वेबसाइटच्या माध्यमाद्वारेही पंचाग सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पंचागकर्ते दाते करीत आहेत. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी. लहानपणापासून घरातील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले मोहनराव दाते सोलापूरच्या समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. सध्या ते या बँकेचे संचालक आहेत. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या कार्याशीही ते संबंधित आहेत. सोलापूरच्या नावलौकिकात ज्यांनी भर टाकली आहे त्यात पंचांगकर्ते दाते यांचे नाव कित्येक वर्षापासून अग्रणी आहे. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनीही त्या लौकिकात आणखी भर टाकली आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on दाते पंचांग’चे मोहन दाते

  1. महोदय
    मी दत्तात्रय जावळे आपल्या कडून मला १९७७ चे पंचांग चे pdf मिळेल का ?
    असल्यास करुया मला या माझ्या whatsapp
    9657490177 नंबर वर पाठवण्याची कृपा करावी
    आपला कृपाभिलाषी
    दत्तात्रय हरिभाऊ जावळे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..