मोहरली ही लेखणी
काव्यात नित्य रमली
लेखणी माझी देखणी
काव्य सुमे स्फुरली
।।१।।
परखड बोलते ही
शब्दवार करते ही
झरझर स्त्रवते ही
जहाल वाटते ही
।।२।।
तोलून मापून भाव
योजून मोजून घाव
व्यक्त होई भरधाव
जपूनच हो राव
।।३।।
अग्रलेख नित्य लिही
कधी ललित लेख ही
भारुड,गवळण ही
रचे छान ओवी ही
।।४।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply