दलदल होता चिखल मातीची,
पाय जाती खोलांत,
प्रयत्न व्यर्थ जाऊनी ,
न होई त्यावर मात ।।१।।
सावध होऊनी प्रथम पाऊली,
टाळावे संकट,
मध्यभागी शिरल्यानंतर,
दिसत नाही वाट ।।२।।
मोह मायेची दलदल असती,
सदैव भोवताली,
चुकूनी पडतां पाऊल ,
खेचला जातो खाली ।।३।।
जागृतपणाचा अभाव असतां,
गुरफूटत जातो,
मोहमायेच्या आकर्षक गुणाला,
बळी तोच पडतो ।।४।।
वेगवान जीवन प्रवाही,
खिळ बसे मोहाने,
क्षणीक सुखाच्या मागे जातां,
दु:खी होई जीवने ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply