भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात. मुळ्याच्या एकंदर चार जाती आहेत. त्या म्हणजे लाल, पिवळसर, पांढसा शुभ्र व थोडासा काळसर. जर एखादे चांगले खत तर मुळ्याची लांबी व जाडी जास्त असू शकेल. मात्र कित्येकवेळा मुळा अत्यंत घाणेरड्या जागेतही लावला जातो पण ते शक्यतो खाऊ नयेत. मुळा हा अत्यंत औषधी असल्यामुळे त्यांत व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम त्यात असतात.
मुळ्याचे उपयोग नुसत्या मुळ्याची सलाड म्हणूनही वापरता येतात तसेच मुळ्याची पाने व मुळा दोन्ही मिळून त्याची भाजीही चांगल्या प्रकारे होऊ शकते तसेच लाल बारीक मुळेही चांगल्या प्रकारचे असतात. त्याची कोशिंबीरही चांगले होऊ शकते. वरील दिलेली वनौषधी घेतल्यास प्रकृतीस निश्चितच मानवते व त्याने पोटाचा कोठा अगदी साफ होतो. मुळा नेहमी कच्चा खाणे चांगले असते तसेच त्याची कोशिंबीरही करतात. मुळा व त्याचा पाला तयार करून त्यावर भाजीही चांगली लागते. तसेच मुळा केल्यावर निरनिराळ्या प्रकारचे सलाड म्हणून त्याचे शोभिवंत म्हणून तयार करतात. त्यात मुळा, गाजर, बीट, काकडी अथवा मुळा व गाजराची पाने शोभिवंत म्हणून ठेवतात.
–
– मदन देशपांडे
Leave a Reply