बिथोवन हा एक जगातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याच्या संगीत रचनांनी असंख्य रसिकांना अक्षरश: वेड लावले.
बिथोवन ने एकदा एका अंध मुलीला पाहिले. त्याने सहज तिची चौकशी केली, तेव्हा ती जन्मापासूनच अंधळी असल्याचे समजले. थोडक्यात तिच्या जीवनात पहिल्यापासून अंधार होता. कारण ती उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकत नाही वा सूर्यास्तही पाहू शकत नव्हती. पांढरेशुभ्र चांदणे म्हणजे काय असते हे त्या मुलीला माहीत नव्हते किंवा कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य ती पाहू शकत नव्हती. बिथोवनला तिची ही अवस्था पाहून फारच वाईट वाटले परंतु एक संगीतकार म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असा विचार त्याच्या मनात घर करून राहिला. या विचाराच्या पूर्ततेसाठी त्याने निसर्गसौंदर्य ओसंडून जाणारे एक काव्य मधुर शब्दात गुंफले व ते अतिशय सुंदर संगीतात स्वरबद्ध केले. ‘मूनलाइट सोनाटा’ म्हणून हे गाणे सर्व जगभर गाजले व लाखो रसिकांनी ते गाणे ऐकून बिथोवनला अक्षरशः डोक्यावर घेतले. ज्या अंध मुलीसाठी बिथोवनने हे गाणे तयार केले होते. त्या अंध मुलीने ते गाणे ऐकताच तिलाही स्वर्गीय सुखाचा भास झाला. ते पाहून बिथोवन ला साहजिक आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना झाली असेल. संगीत आणि सुरांतील सामर्थ्य त्याने सिद्ध करून दाखविले होते.
Leave a Reply