गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – २ :
श्री गणेश जन्माच्या कथेत भगवान विष्णूंनी जंगलातून गज मस्तक आणले असे वर्णन आहे.
शास्त्रकारांना या शब्दात फार वेगळा चा अर्थ अभिप्रेत आहे. अडचण अशी आहे की तो अर्थ दृश्यरूपात सांगणे शक्य नाही. त्याची चित्र काढता येत नाही. त्याची मूर्ती बनवता येत नाही. त्यामुळे शेवटी गजर या शब्दाचा समानार्थी शब्द हत्तीचे मस्तक प्रतीक रूपात वापरले आहे.
मग मूळ गज शब्दाचा अर्थ काय? तर गज शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी आपल्याला त्यातील अक्षरांची रचना समजून घ्यावी लागेल. गज शब्द दोन अक्षरे आहेत ग आणि ज. आता या अक्षरांची गंमत पहा. ही अक्षरे पलटवा. शब्द तयार होतो जग.
हे जग कसे आहे याचे वर्णन करता येते. शास्त्र त्याचे लांबलचक वर्णन देते.
हे जग कधीतरी तयार झाले आहे म्हणून त्याला सादी असे म्हणतात. हे जग कधीतरी नष्ट होणार आहे म्हणून त्याला सांत असे म्हणतात. या जगात वेगवेगळे भाग आहेत म्हणून त्याला सावयव असे म्हणतात. हे तीन गुणांनी बनले आहे म्हणून त्याला सगुण म्हणतात. सोप्या शब्दात जे सादी, सांत, सगुण-साकार सावयव ते जग.
या जगाच्या उलटा शब्द आहे गज. अर्थात या जग च्या विपरीत ते गज. म्हणजेच जे अनादि, अनंत,निर्गुण-निराकार, निरवयव ते “गज.”
हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात.
“गजमस्तक” चा हाच अर्थ असतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply