गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ७ :
श्री गणेशांच्या बाबतीत जो विषय सर्वाधिक वेळा विचारला जातो, किंवा ज्या बाबतीत गणेश उपासकांमध्ये सर्वाधिक धास्तीचे वातावरण आहे तो विषय म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती.
उजव्या सोंडेचा गणपती फार कडक असतो. त्याची उपासना अत्यंत कठीण असते. त्यासाठी खूप सोवळेओवळे करावे लागते. त्याच्या उपासनेत थोडीही चूक झालेली चालत नाही. इथपासून तर यांच्या यांच्याकडे उजवा गणपती होता त्यांना कसे कसे त्रास झाले इथपर्यंत अनेक बाबीवर लोक धडाड बोलताना दिसतात.
पहिली महत्वाची गोष्ट अत्यंत स्पष्ट रीतीने ठासून सांगतो की आज पर्यंत मी वाचलेल्या कोणत्याही श्री गणेश विषयक शास्त्रीय ग्रंथात उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा गणपती असा साधा उल्लेख देखील नाही. मग त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही देवतेची उपासना ही प्रीतीने व्हायला हवी भीतीने नाही.
मोरया मंगलमूर्ती आहे. तो कधीही कोणाचे अमंगल करतच नाही.
त्यानिमित्ताने चार नियम पाळले जातात म्हणून समाजात ते रूढ झाले इतकेच.
त्यामुळे या समजाला कुठलाही आधार नाही. याचा विचार न करता सुखाने उपासना करावी.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply