गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ८ :
श्रीगणेशांचा आवडता रंग कोणता? तर लाल. त्यांना गंध कोणत्या रंगाचे लावायचे? तर लाल. त्यांचे आवडते फूल कोणत्या रंगाचे? तर लाल. त्यांचे आवडते वस्त्र कोणत्या रंगाचे? तर लाल. पण लालच का?
आपल्या संस्कृतीत प्रत्येक देवतेला एकेक रंग वाटून दिलेला आहे. भगवान शंकरांचा आवडता रंग पांढरा. भगवान विष्णूंचा आवडता रंग निळा. देवी लक्ष्मी चा आवडता रंग पिवळा. आई जगदंबेचा आवडता रंग हिरवा. तर मोरयाचा आवडता रंग लाल. या रंगांच्या मागे काय कारणमीमांसा असेल?
सगळ्या रंगांचा विचार तर शक्य नाही. पण देवीचा हिरवा आणि मोरयाचा लाल यांचा एकत्र विचार करू.
हे दोन रंग एकत्रित दिसतात सिग्नलवर. तिथेच त्यांच्या गुणांची रचना लक्षात येते. हिरवा लागला की धावपळ सुरू होते. उलट लाल लागला की ती थांबते.
जगातील कोणत्याही भाषेत सूचना लिहिलेले कोणतेही मशीन असो त्याचे सुरू करण्याचे बटन हिरवे असते आणि बंद करण्याचे लालच.
जगदंबेच्या अर्थात मायेच्या प्रांतात आले की धावपळच असते.
उलट मोरयाच्या जवळ गेलो की लाल असल्यामुळे आता थांबणे आहे.
ज्याच्या पायाशी आल्यावर सर्व धावपळ, दुःख, संकट, समस्या थांबून जातात, शांत होतात त्या मोरया चा रंग “लाल” असतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply