नवीन लेखन...

मॉर्निंग वॉक

उठा उठा, एक जानेवारी जवळ आली, नवीन resolution करण्याची वेळ झाली! म्हणजे मी तरी निदान एक तारखेला नवीन resolution करते. शास्त्र असतय ते!  आणि ते दोन तारखेला मोडते. पण नवीन resolution करण्यात पण एक गंमत असते. आता त्यातही एवढे जास्त प्रकार आहेत की “मोडायचच आहे तर चला, जरा कठीण resolution करू ” असं म्हणून मी गूगल बाबाला हाताशी घेऊन शोधाशोध करत असते. आमच्या वेळेला गूगल बाबा नव्हता, फेबु नव्हतं, थोडक्यात काय तर ज्येष्ठ मंडळी आमचे गूगल बाबा होते. आणि त्यात “वजन वाढवा/ वजन कमी करा” एवढे दोनच पर्याय असायचे. आणि ही सूचना वर्षभर येत राहायची. त्याला एक जानेवरीचा मुहूर्त लागत नसे.

“गधडे, अजून वर्ष पूर्ण नाही झालं आणि युनिफॉर्म घट्ट व्हायला लागलाय. खाली खेळायला जाता की नुसत्या गप्पा मारत बसता?” शाळेत असताना .. एकदा रस्त्याने मुलाला कडेवर घेऊन जात असताना एक मैत्रीण भेटली. मला बघताच म्हणाली, “काय गं हे? एक कडेवर आणि दुसरं पोटात?” मी पण एकदम घाबरलेच. “काहीही काय बोलतेस?”

“अगं, मग जरा व्यायाम कर. केवढं ते पोट! ” मी तत्परतेने मॉर्निंग वॉक सुरू केला. मी निघाले की शेजारीण विचारायची,” मोर्निंग वोक माटे जाये छे, केम?” माझ्या सळाळत्या उत्साहावर तिच्या ” मोर्निंग” ने शोकाकुल अवस्था करून अगदी पाणी टाकलं होतं. खास वॉक साठी आणलेले नवे कोरे कपडे (बुजगावणं दिसतंय या शेऱ्यामुळे) कपाटात जागा अडवून बसले. मग उगाच शेजारी पाजारी जाहिरात नको म्हणून मी जिमला जायला लागले. “पैसे घालवायची लक्षणं, दुसरं काय?” असा घरचा आहेर मिळालाच. माझी जिम इनस्ट्रक्टर अगदी पाँड्स च्या जाहिरातीतील मम्मी होती! “दो बच्चोंकी माॅं? यकीन नहीं होता” वाली. एकदा म्हणाली, “मी आज 31st डिसेंबर पार्टीसाठी गाऊन शिवायला टाकला. त्याला सांगितलं की ४”-४” कमी शिव. म्हणजे आता एक महिन्यात मला तेवढं वजन आणि इंचेस कमी करायचे आहेत! ” मी भारावून गेले नसते तरच नवल. मी ही तत्परतेने एक ब्लाऊज शिवायला घेऊन गेले. (ब्लाऊज वर प्रयोग करावा, उगाच जास्त पैसे कशाला वाया घालवायचे?) माझा “शिंपी” होता. Family doctor असतो तसा फॅमिली शिंपी. मला बालपणापासून त्याने बघितलं होतं. मी सांगितलं की २”-२” कमी शिवा, मी वजन कमी करणार आहे.

“अजिबात नाही. लहानपणापासून जेव्हा जेव्हा तू कपडे शिवायला घेऊन येतेस, तेव्हा तेव्हा २”-२” वाढलेलं असतं. आता एक महिन्यात कमी कसं होणार? नंतर म्हणशील की लूज करून द्या. मी काय जादुगार आहे?”  मी विचार केला की जाऊ दे, २” वाढणारच आहे तर मग कशाला उगीच उपासतापास, व्यायाम करून शरीराला कष्ट द्यायचे? अश्या तऱ्हेने “वाढता वाढता वाढे” चालू आहे. जमेल तसा, जमेल तेव्हा “मोर्निंग वोक” करत असते. फॅशन म्हणून हातात Fitbit घालते. आज किती स्टेप्स झाल्या? असं कोणी विचारलं की सांगते, चार्ज करायला विसरले होते. बाहेर पडल्यावर लक्षात आलं!

साहिब बिबी और गुलाम सिनेमात, मीनाकुमारी म्हणते, “गेहेने बनवावो, गहेने तुडवावो, उसीमे खुश रहो!”
मी आता तसच म्हणते, resolution करा, resolution मोडा, त्यातच खुश रहा! मग या वर्षी कोणतं resolution करावं बरं?

– संध्या घोलप

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपच्या लेखिका

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..