आई वडील आणि घरातली वडिलधाऱ्यांना रोज सकाळ संध्याकाळी वाकून पायाला दोन्ही हातांच्या बोटांनी स्पर्श करुन नमस्कार करण्याची पद्धत आता जवळ जवळ बंद झाली आहे.
आपले जे रितिरिवाज होते त्यात अनेक तथ्य होती पण चूक इथे झाली की त्याचा अर्थ आणि फायदा काय आहे हे नीट समजावून न सांगितल्याने सगळं हळू हळू बंद झालं.
पाया पाडण्यासाठी जेव्हा आपण वाकतो, तेंव्हा आपण पाठीचा कणा वाकवतो.पाठीच्या कण्यावर मंगळाचेअधिपत्य असते.
रोज असे वाकल्याने आत्मविश्वास वाढतो.
जेंव्हा आपण पायांना स्पर्श करतो तेंव्हा अंगठ्या जवळील पहिले बोट, मधले बोट आणि करंगळी जवळील बोट ह्यांचा पायांना स्पर्श होतो. ही बोटे अनुक्रमे गुरु, शनि आणि सूर्याच्या अधिपत्या खाली येतात. ह्या अश्या स्पर्शाने गुरु, शनि आणि रवी हे ग्रह कार्यान्वित होतात.
पायांना स्पर्श करताना उजव्या हातानी उजव्या पायाला आणि डाव्या हातानी डाव्या पायाला स्पर्श करावा. कारण समान ऊर्जेच वहन होणे जरुरी असते.
आपले आई वडील आपल्याला जो आशीर्वाद देतात त्या सारख अमूल्य ह्या जगात काहीही नाही. त्यांच्या पावलांना स्पर्श करण्यात जो आनंद असतो तो कशातही नसतो. आई चे उपकार तर कधीही न विसरण्या सारखे असतात. आपला जन्म म्हणजे तिचा सुद्धा दुसरा जन्म असतो, एवढ्या मरण यातना तिला सहन कराव्या लागतात.
म्हणून आई वडील मोठी माणसे असे पर्यंत नमस्कार करा, न चुकता..सुख आणि शांती नक्की मिळेल. कारण नंतर फोटोला नमस्कार करुन काहीही उपयोग नसतो..
— विलास सातपुते.
Leave a Reply