श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी.
दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी.
२०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी नंदिनी यांनी मोत्याचे छोटे कंदील बघितले. त्यानंतर लगेचच त्यांनी अशा प्रकारचे मोठ्या आकारातले कंदील बनवायला सुरुवात केली. बघता बघता आठ महिन्यात त्यांनी २०० कंदील बनवून पूर्ण केले. त्यापैकी अनेक कंदील विकलेसुद्धा गेले.
पहिला कंदील बनवायला नंदिनी जोशी यांना एक महिना लागला. त्याचा आकार कसा वाढवावा, एखादं डिझाईन त्या कंदिलात कसं बसवावं हे समजून
घेण्यात महिना गेला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या काही मैत्रिणींनीसुद्धा यात रस दाखवला. नंदिनी यांनी स्वत:
त्या मैत्रिणींना ही कला शिकवली आणि आज त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे. या सगळ्यांनी मिळून गेल्या काही महिन्यांत शेकडो कंदील बनवले असून त्यातले अनेक कंदील दिवाळीच्या आधीच विकले गेले आहेत.
या आकाश कंदिलासाठी वापरलेल्या वस्तू जितक्या भन्नाट तितक्याच याच्या डिझाईन्ससुद्धा भन्नाट असतात. विमान, मासा, हंस, गोल, षटूकोन
असे अनेक निराळे आणि भन्नाट आकार या आकाश कंदिलात बघायला मिळतात.
आकाश कंदिलासारख्या कलात्मक प्रकारातली त्यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी आहे.
Leave a Reply