उंदरासारखा सारखा उंदिर (तो त्याचाच सारखा असणार,तो काही अर्नाल्ड स्वात्जबर्ग पहेलवानासारखा कसा असेल?) परवा विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील अभिजनांना त्यांच्या डब्यात दिसला काय नि एकच हलकल्लोळ माजला काय? हा इथे आलाच कुठून आणि कसा हा पहिला सवाल दणक्यात अभिजनमुखी आला नि आरडाओरड सुरु झाली.विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये या उंदराने येऊ नये असे फर्मान रेल्वेबोर्डाने काढलेले नाही.हे अभिजनांना ठाऊक असायला हवे.असो प्रश्न असा आहे की हा उंदिर डब्यात आला कसा किंवा शिरले कसा ?
अभिजन ज्या मार्गानी आपआपल्या श्रेणिंच्या डब्यात दाखल होतात,त्याच मार्गाने उंदिरसुध्दा येऊ शकतात.तसे असेल तर मग तो डब्यात शिरत असताना एकाही अभिजनांच्या लक्षात कसे आले नाही.किंवा मग उंदिर खुष्किच्या मार्गाने प्रवेश करता तर झाला नाही ना! हिंदी आणि अर्नाल्डच्या हॉलिवूड सिनेमांमध्ये हिरो आणि विलेन रेल्वेतील खुष्कीच्या मार्गाचा उपयोग करुन पोलिसांच्या हातावर तुरी देताना आपण पाहिलेलेच आहे.उंदरांसाठी तो मार्ग निषिध्द असल्याचे सुध्दा फर्मान हिंदुस्थान आणि अमेरिकेतल्या रेल्वे बोर्डाने काढण्याची सुतरात शक्यता नाही.
अभिजनांच्या एसी-टू डब्यात प्रवेश करता झालेल्या उंदराकडे हे अभिजन वेगवेगळ्या कोनातून बघू लागले.आपल्या मागावर असलेला हा कुणीतरी इस्लामाबादी वा लाहोरी हेर नाही ना असे काहिंना मनात वाटून गेले असावे.काही जणांची अव्यक्त सुक्ष्म प्रतिक्रिया,इज ही टेरॅरिस्ट,अशीही असावी.पोलिसांना बोलवा किंवा गाडिची साखळी ओढा असे उपाय तातडिने करायला हवे असे एकमेकांच्या विको टर्मेरिक आणि पॉण्डस लावलेल्या गोजिऱ्या मुखाकडे बघत अभिजनांना एकमेकांना म्हणावेसेही वाटू लागले असावे.मात्र अभिजनांनी प्रत्यक्षात ते काही केले नाही.काहिंनी अटेंन्डन्टला शिव्या हासडल्या.दिखता नही क्या,चुहा आया करके,असे ते डाफरले.उंदरावर नजर ठेवण्यासाठी काही अटेंडन्टची नियुक्ती नाही.तो बिचारा सेवेकरी.त्याला धारेवर धरुन या गुस्ताखीसाठी तोच जबाबदार असावा असेही एखाद दुसऱ्या अभिजनांनी आपल्या हावभावातून व्यक्त केलेच.सेवेकऱ्याने उंदराला शिव्या हासडून,आता दाखवतो इंगा असे बोलून उंदराचा शोध प्रत्येक कम्पार्टमेन्ट सुरु केला.उंदिर त्याच्या स्वागताला थोडाच दर्शनी भागात उभा राहणार.तो सेवेकरीला दिसलाच नाही.त्याने हुश्श केले.अभिजनांनीही हुश्श केले.सुटलो बुवा,हीच प्रतिक्रिया बहुतेकांची.या प्रतिक्रियेचा श्वास घेऊन होत नाही तोच उंदिर तुरुतुरु इकडून तिकडे.
पुन्हा,रात भर निंद डिस्टर्ब.बॅग आणि संत्र्याच्या पिशव्या कुरतडून ठेवणार.पायाची बोटे कुरतडली तर?कानच कुरतडायाचा.या प्रतिक्रिया आणि उंदराला शिव्या.पोलीस बुलाव आणि साखळी ओढण्याची पुन्हा अव्यक्त इच्छा.सेवेकरीला व्यक्त शिव्या.उंदराचा उध्दार.कम्पार्टमेन्टमधील आरडाओरड आणि पायांनी हाटहूट करण्यामुळे उंदिर पुन्हा तुरुतुरु इकडून तिकडे.शोधुनही दिसत नाही.
साल्ला ये है कोन ?मंगळावरुन तर आला नाही ना ?गुप्तहेर आहे का ? मोबाईलवरुन चालणारे अभिजनांचे गुफ्तगू ऐकण्यासाठी ,त्यास कुणी भरडा किंवा चिकनी सुपारी दिली नाही ना ? दाऊदका तो आदमी (?) नही ये.आपल्याच कम्पार्टमेन्टमध्ये आणि आपल्याच डब्ब्यात कसा?अरे,कुछ नही यार किसी बच्चे का टॉय-वाय होंगा.अशा बहुवीध अव्यक्त प्रतिक्रियांनी काळजीचे ढग एसीटूच्या डब्ब्यात दाटून आले.सेवेकऱ्याने,उंदिर ते किटक भगाव हिटचा फवारा प्रत्येक कम्पाटमेंटमध्ये जोरात आणि जोशात ओढला.त्या हिट सुंगधाने अनेकांची डोकी दुखायला लागली.आता आपण सुरक्षित अशी सुखाची लकेर चेहऱ्यावर उमटत नाही तोच उंदिर पुन्हा तरुतुरु इकडून तिकडे.एसीटूमध्ये सुखाची निंद घेण्यासाठी आलेल्या अभिजनांची निंद हराम.
मला वाटले हा उंदिर टॉम आणि जेरीतला जेरी तर नाही ना.. हा मिकी माऊस तर नाही ना..अरे हा स्टुअर्ट लिटल तर नाही ना..अरे हा मुषकस्वामी तर नाही ना..डब्यातल्या अनेकांना असेच काहीबाही वाटत राहिले.साखळी कुणी ओढली नाही.कारण ते करायचं कुणी,हा प्रश्न होताच.पोलिसांना सांगायचं कुणी,कारण एका उंदराला तुम्ही डरता.डरपोक कहिके,असे पोलिसांनी म्हंटले तर,ही भीती.त्यामुळे तेही नाही.प्रवास असाच काळजित,निंद हराम करतच झाला.कोणे एकेकाळी नाना पाटेकर म्हणाले होते की एक मच्छर आदमी को काही-बाही करु शकतो.तसेच उंदिर एसीटूची (सुखाची) निंद हराम करु शकतो.आपली अंगभूत पॉवर उंदरास कळली तर आजपासून पाच हजार वर्षांनी एखादी उंदिर टोळी आख्खी ट्रेनही हायजॅक करु शकतील..
Leave a Reply