उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणुस एकुणच मागे आहे हे आता सगळेजण जाणतातच आहेत. पण आता या क्षेत्रांत मराठी महिला धडाडिने पुढे येत आहेत असे सुखद चित्र निर्माण होऊ लागले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत आज मराठी नव्हे तर इतर महिला मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहेत. अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या प्रमुखपदी महिला आहेत आणि त्या सक्षमतेने कारभार चालवीत आहेत.
इंजिनिअरींगच्या क्षेत्रातील मेकॅनिकल इंजिनिअरींग ही शाखा आपल्यासाठी नाही असे अनेक महिलांना वाटत असते. ते एका दृष्टिने बरोबर पण आहे. कारण या क्षेत्रासाठी मानसीक बळाबरोबरच शारिरीक बळ पण लागते. तासंतास वर्कशॉपमधे उभे राहुन मशीनवर काम करावे लागते. हात आणि कपडे काळे करावे लागतात. कधी कधी तप्त भट्टी असलेल्या फाउंड्रीमधे काम करावे लागते. नोकर्याउ पण लांबच्या कुठल्यातरी कारखान्यांत मीळतात. कामगारांबरोबर काम करावे लागते. तसेच शिफ्टस पण असतात. त्यासाठी बायकांसाठी हे क्षेत्र योग्य नाही हे म्हणणे कांही फारसे चुकिचे नाही. असे असुनही काही महिला मेकॅनीकल इंजिनीयरींगच्या क्षेत्रांत येण्याचे धाडस पुर्वीपासुनच करत आल्या आहेत. आधी त्यांची संख्या तशी नगण्यच होती. पण आता ती संख्या हळु हळु वाढायची चिन्हे दिसु लागली आहेत.
जाणुन बुजुन मेकॅनीकल इंजिनीयरींगची साईड निवडणे, मग उद्योग व्यवसायच्या क्षेत्रांत प्रवेश करणे, आंतर राष्ट्रीय पातळीवरील एक अत्यंत प्रतिष्ठीत व मानाची परिक्षा पास होऊन हा मान मिळविणारी भारतातील पहिली महिला इंजीनीयर होणे हा प्रवास आहे पुण्यातील एका महिलेचा, सौ.धनश्री जोग यांचा. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतुन उलगडत गेला त्यांचा जीवनपट.
सौ.धनश्री यांच्या कुटुंबाला इंजिनिअरींगची कोणत्याही तर्हेयची पार्श्वभुमी नाही. त्यांचे माहेरचे आडनांव देशपांडे. जन्म 1974 सालचा व पुण्याचा. आई वडील दोघेही सरकारी नोकरीत होते. शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कुलमधे झाले. पहिल्यापासुनच त्यांचा ओढा इंजिअरींगकडे होता. त्यामुळे त्या पुण्याच्या गव्हर्नमेन्ट कॉलेजमधुन मेकिनिकल इंजिनीयर झाल्या. वर्गात फक्त पांचच मुली होत्या. पण एक मुलगी म्हणुन त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरींग करण्यासाठी कुठली अडचण अशी आली नाही.
त्यांना पुण्याच्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या बेअरींग डिव्हीजन मधे ट्रेनी इंजिनीयर म्हणुन नोकरी मिळाली. त्यावेळी असा अनुभव आला की पुण्यातील बहुतेक कंपन्या व नांवाजलेले कारखाने लेडी मेकिकल इंजिनिअर्सना नोकरी द्यायला फारसे उत्सुक नसायचे. पण त्यांना किर्लोस्करसारख्या नामांकीत कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.
या नोकरीचा अनुभव फारच चांगला होता. या काळात त्यांनी ट्रेनी इंजिनीयर ते सिनीयर इंजिनीयर होण्यापर्यंत प्रगती केली. त्या मशीन शॉप इंनचार्ज होत्या. त्यांना प्रॉडक्शनचा व त्या संबंधीत इतर क्षेत्रांचा-जसे प्रॉडक्शन प्लॅनींग कंट्रोल(PPC), क्वालिटी कन्ट्रोल, इंनव्हेंटरी कंट्रोल, मॅनपॉवर प्लॅनींग याचा उत्तम अनुभव आला. हाच अनुभव माझ्या भावी करीअरचा पाया ठरला.
त्यानंतर त्यांनी मेटॅग्राफ ग्रुपमधे काम केले.
विवाह झाल्यावर त्यांना फुल टाईम जॉब करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कराव असे वाटु लागले. त्यांना मॅनेजमेन्ट कंन्सल्टन्सी क्षेत्राची माहिती मिळाली. हे क्षेत्र त्यांना योग्य आहे असे वाटले. त्यामुळे या क्षेत्रांत येऊन बिझनेस करायचे ठरवले.
त्यांच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे बिझनेसची पार्श्वभुमी नाही. फक्त त्यांचे चुलत दीर आहेत त्यांनी बिझनेसमधे प्रवेश करण्याचे धाडस दाखवले. त्यांनी अक्षरशः शुन्यातुन सुरवात केली. त्यांची दरोडे जोग ही कंपनी आता पुण्यातील एक प्रतिष्ठीत बिल्डर आहे.
मॅनेजमेंट कन्सल्टन्सी खरे म्हणजे हे एक विस्तृत, वेगाने वीकसीत होणारे व महत्वाचे क्षेत्र आहे. हल्ली कंपन्यांना निरनिराळ्या सर्टिफिकेशनची गरज भासत असते. त्यांत आय.एस.ओ.(ISO) व यासारखी अनेक महत्वाची सर्टिफिकेशन आहेत. ज्या कंपन्यांकडे हे सर्टिफिकेशन आहे त्या कंपन्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची समजली जाते. ज्या प्रमाणे गुंतवणुकिच्या क्षेत्रांत ट्रीपल ए ( AAA) किंवा क्रिसील (Cricil) रेटिंगला जे महत्व आहे तेच महत्व औद्योगीक क्षेत्रांत आय.एस.ओ. व यासारख्या इतर सर्टिफिकेशनला आहे. भारतामधे जवळ जवळ सगळ्या मेठ्या कंपन्यांकडे ही सर्टिफिकेशन आहेत. आता लघु उद्योग(Small Scale Industry) व मध्यम उद्योग (Medium Scale Industry) क्षेत्रातील कंपन्या या सर्टिफिकेशनसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु ही सर्टिफिकेशन मिळविणे वाटते तेवढे सोपे काम नसते. कारण यामधे कंपनिची टोटल मॅनेजमेंट इनव्हॉल्व असते. त्यामुळे या कंपन्यांना मॅनेजमेन्ट तज्ञांची किंवा कन्सल्टंटची जरुरी भासते. हे एक हायली स्पेशलाइज्ड फील्ड आहे. तसेच बर्यालच कंपन्यांचे निरनिराळे प्रॉजेक्टस असतात. उत्पादनांचा व सेवांचा दर्जा सुधारण्यापासुन ते टेक्नीकल स्पेसीफिकेशन्स ठरवण्यापर्यंत अनेक प्रॉजेक्टस असतात. त्यासाठी त्यांना तज्ञ सल्लागारांची मदत लागत असते.
त्यांनी काम करायला सुरवात केल्यावर त्यांच्या लक्षांत आले की हे पुरुषांचे डॉमीनेशन असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रांत महिला जवळ जवळ नाहीतच. यावेळी त्यांना याच क्षेत्रातील श्री. रामदास जैद व श्री. कुलदीप जोशी या दोन दिग्गज व्यक्तींची फार मदत झाली. तसेच त्यांचे पती निनाद यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळत गेले.
त्यांच्या कंपनिने बरीच प्रगती केली आहे. 200 च्या वर प्रॉजेक्टस पुर्ण केले आहेत. भारतामध्ये तसेच परदेशात पण प्रॉजेक्टस पुर्ण केले आहेत. आता त्यांच्याकडे सक्षम टीम आहे. स्वतंत्र ऑफीस आहे.
‘या क्षेत्रांत येण्यासाठी कांही विषेश क्वालिफिकेशन्सची आवश्यकता असते कां? कारण तुमच्याकडे अशी बरीच क्वलिफिकेशन्स आहेत.’ असा प्रश्न मी विचारला तेव्हा त्या म्हणाल्या ‘तसे पाहिले तर नाही. कारण या क्षेत्रामधे बरेच रिसर्च करावे लागते. पण जर तुमच्याकडे काही विषेश क्वालिफिकेशन्स असतील तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. मला ऍटोमोबाईल क्षेत्राचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. ‘टुल्स ऍन्ड टेक्निस ऑफ बिझिनेस परफॉर्मन्स इंप्रुव्हमेन्ट’ या विषयांतील मी तज्ञ असुन व्यवस्थापन यंत्रणेसीठीचा सल्लागार म्हणुन मला अनुभव आहे.’
त्यांना विचारलेले अजून काही प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे
प्रश्नः- तुमची कंपनी कोणत्या प्राकारच्या कन्सल्टन्सी सेवा पुरवते?
धनश्रीः- आम्ही वेगवेगळ्या स्टॅन्डर्ससाठी कन्सल्टन्ट व ऑडीटर म्हणुन काम करतो. प्रोसेसमधे किंवा मॅनेजमेण्टमध्ये सुधारणा करणे, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देणे ही पण कामे करतो. आम्ही मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स बरोबर पॅनल कन्सल्टन्ट म्हणुन काम केले आहे.
प्रश्नः- रिसर्च करण्याची क्षमता आणि विषेश क्वालिफिकेशन्स या शिवाय अजुन कशाची आवश्यकता असते?
धनश्रीः- यासाठी उत्तम मार्केटींग व उत्तम नेटवर्क असायला हवे. कारण बहुतेक प्रॉजेक्टस हे वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीवरच मीळतात. तसेच कंपनीमधे टॉप ते बॉटम लेव्हलच्या माणसांबरोबर डील करता येण्याची हातोटी लागते. बराच प्रवास पण करावा लागतो.
प्रश्नः- हल्लिच्या मराठी तरुण व विशेषतः तरुणिंसाठी तुम्ही काय ऍडव्हाईस द्याल?
धनश्रीः- मी कोणाला ऍडव्हाईस देण्याएवढी कांही ग्रेट नाही. पण माझ्या अनुभवावरुन सांगावेसे वाटते की जर पती व पत्नी दोघेही क्वालिफाईड असतील तर पत्निने जरुर बिझीनेस करावा. बिझिनेसमधे पतिचा व कुटुंबातील इतर सदस्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक असते. माझ्या केसमधे मला माझे पती निनाद यांचा भरघोस पाठिंबा मिळाला. म्हणुनच मी एवढी प्रगती करु शकले.
आयएसओ-टीएस 16949 ही आय.ए.टी.एफ. ( इंटरनॅशनल ऑटोमोटीव्ह टास्क फोर्स) या संस्थेतर्फे घेण्यात येणारी लेखा परीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण होणारी धनश्री या भारतातील पहिल्या महिला इंजिनीयर आहेत. या परिक्षेसाठी ‘सरमेट’ या इटालीयन संस्थेने त्यांना प्रायोजकत्व दिले होते. या साठी श्री. रामदास जैद यांनी मार्गदर्शन केले. पुण्याच्या सकाळ या दैनिकाने त्यांच्या सोमवार दि. 5 मार्च 2012 च्या अंकांत हे वृत्त प्रसिद्ध करुन त्यांचा खास गौरव केला आहे. तसेच दै. लोकमत तर्फे पारितोषीक देऊन सत्कार करण्यांत आला असुन हे वृत्त लेकमतच्या सोमवार दि. 26 मार्च 2012 च्या अंकांत प्रसिद्ध करण्यांत आले आहे. नुकतेच त्यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस श्री फाऊंडेशन तर्फे ‘उद्योग सल्लागार’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
धनश्रीची व त्यांच्या कंपनिची अशीच उत्तरोत्तर भरघोस प्रगती होत राहो अशा शुभेच्छा!
–उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
Leave a Reply